PMC Security Department | सुट्टीच्या दिवशी महापालिका भवनात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची केली जाणार चौकशी! | महापालिका सुरक्षा विभागाचा निर्णय!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – सुट्टीच्या कालखंडात पुणे महापालिका भवनात (PMC Building) महापालिकेचे स्थायी कर्मचारी कंत्राटी कामगार, मानधन तत्त्वावरील कामगार, (PMC Employees) विविध कारणासाठी येत असतात. मात्र यापुढे या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. संबंधित विभागाच्या खातेप्रमुखाचे नावानीशी पत्र असल्याशिवाय कर्मचाऱ्याला आतमध्ये आम्ही सोडणार नाही. अशी माहिती महापालिका सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (Rakesh Vitkar PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
स्वारगेट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे विटकर यांनी सांगितले. सुट्टीच्या दिवशी महापालिका भवनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेतली जाणार आहे. लवकरच यावर अमलबजावणी केली जाणार असल्याचे विटकर यांनी सांगितले.
| सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
दरम्यान स्वारगेट प्रकरणातून महापालिकेच्या सुरक्षा विभागाने चांगलाच धडा घेतला आहे. सुरक्षा विभागाने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील उद्याने, शाळा, दवाखाने, या ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाना प्रशिक्षण दिले आहे. आपल्या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याबाबत दक्ष कसे राहावे, भामट्या लोकांना लगेच कसे ओळखावे आणि त्यांना संबंधित परिसरातून हाकलून द्यावे, आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशा प्रकारचे प्रशिक्षण दिल्याचे राकेश विटकर यांनी सांगितले. दरम्यान जे कर्मचारी आपल्या कामात कामचुकार पणा करतील, त्यांना कामावरून कमी करणार असल्याचा इशारा देखील विटकर यांनी दिला आहे.
COMMENTS