PMC SDD | पुणे महापालिकेकडून उद्या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रम
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगररपालिकेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग मेळावा उद्या म्हणजे ३ डिसेंबर ला बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत होणार आहे. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
त्यामध्ये दिव्यांग योजनांचा आढावा व माहिती, दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ कायदे विषयक मार्गदर्शन, रोजगार विषयक मार्गदर्शन व दिव्यांगांसाठीच्या योजनांची माहिती, विशेष व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, दिव्यांगांचे व्यवसाय गट, सामाजिक उपक्रम राबविणारे दिव्यांगाचे बचत गट, उत्कृष्ट प्राविण्यप्राप्त खेळाडू, पुणे महानगरपालिका आदर्श दिव्यांग कर्मचारी, उत्कृष्ट दिव्यांग कलापथक यांचा सत्कार, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन इत्यादींचा समावेश आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS