PMC School Attendence | पुणे महापालिकेच्या  शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी आता ऑनलाईन प्रणाली!

Homeadministrative

PMC School Attendence | पुणे महापालिकेच्या  शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी आता ऑनलाईन प्रणाली!

Ganesh Kumar Mule Mar 19, 2026 8:54 PM

Government Schemes | सरकारच देणार आता सरकारी योजनांची माहिती! | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना
PMC Security Department | राज्य सुरक्षा महामंडळ कडून महापालिका घेणार १०० सुरक्षा रक्षक | मुख्य सभेच्या मान्यतेनंतर देण्यात आले कार्यादेश
Mohalla Committee | PMC Pune | मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन  | प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 

PMC School Attendence | पुणे महापालिकेच्या  शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी आता ऑनलाईन प्रणाली!

| शिक्षण समितीत प्रस्ताव मान्य

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती (Attendance) आता डिजिटलायझेशन स्वरूपात करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण समिती बैठकीत प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.  (PMC Education Committee)

भाजपच्या नगरसेविका कोमल नवले (Komal Navale PMC) यांनी याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यानुसार  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शाळांमधील उपस्थिती नोंदवही (Attendance) डिजीटल पध्द्धतीने ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. यामुळे उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक पारदर्शक व सुलभ होऊ शकते. विद्वयार्थ्यांसाठी डिजीटल उपस्थिती प्रणालीमुळे त्यांच्या उपस्थितीची अचूक नोंद ठेवता येईल तसेच पालकांनाही त्यांच्या उपस्थितीची माहिती वेळोवेळी मिळू शकेल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नियमिततेची सवय लागेल.

प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, शिक्षकांसाठी देखील डिजीटल उपस्थिती प्रणाली उपयुक्त ठरेल. शिक्षक व कर्मचारी वर्ग यांच्यावर नियंत्रण राहील. यामुळे वेळेची बचत होईल कागदी कामकाज कमी होईल आणि उपस्थिती अहवाल सहजपणे तयार करता येतील तसेच प्रशासनालाही शाळेची उपस्थितीची माहिती त्वरीत मिळू शकेल. त्यानुसार  सर्व शाळांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली मोबाईल अॅप किंवा ऑनलाइन उपस्थिती  प्रणाली लागू करण्यास मान्यता देण्यात यावी. असे प्रस्तावात म्हटले होते. नुकत्याच झालेल्या शिक्षण  समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: