PMC Scholarship Schemes | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना सहित विविध योजनांची मुदत वाढवली | जाणून घ्या कालावधी
PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची मुदत वाढवण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता मुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. हा कालावधी आता ३१ जानेवारी पर्यंत असणार आहे. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. यासाठी ३० सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला होता. मात्र हा कालावधी वाढवण्यात आला होता. पुनः एकदा हा कालावधी वाढवण्यात आला आहे. पात्र विद्यार्थी यासाठी ३१ जानेवारी पर्यंत अर्ज करू शकतात.
१३३२१ अर्ज प्राप्त
दरम्यान आतापर्यंत दोन्ही योजनासाठी १३३२१ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. मात्र यातील ३३३७ अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागा यांच्या वतीने देण्यात आली आहे.
दिव्यांग मेळावा पुढे ढकलला
समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी ३ डिसेंबर रोजी दिव्यांग मेळावा घेण्यात येणार होता. मात्र आचारसंहिता मुळे याबाबतचे तांत्रिक काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतची तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे. असेही समाज विकास विभागाकडून सांगण्यात आले.
—-
COMMENTS