PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची महत्वाची सूचना
PMC Scholarship for 10th, 12th Student | पुणे | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
| Save as Draft मध्ये ठेवला जातोय अर्ज
त्यानुसार ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे (PMC Devlopment Department) प्राप्त होत आहेत. तथापि, विभागाच्या असे निदर्शनास आले आहे की अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच अर्ज हा save as draft मध्ये ठेवत आहे. त्यामुळे महापालिकेने सूचना केली आहे कि. २९/१२/२०२३ (वेळ-सायं. ५.३० वा.पर्यंत dbt.pmc.gov.in संकेतस्थळावर) ही अंतिम तारीख विचारात घेऊन अर्जदाराने भरलेला अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज submit करावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदारावर राहील. असा इशारा समाज विकास विभागाकडून देण्यात आला आहे. (PMC Pune News)
| 5052 अर्ज प्राप्त
समाज विकास विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत या दोन्ही योजनांसाठी 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांचे एकूण 5052 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 2468 अर्ज हे save as draft मध्ये ठेवण्यात आले आहेत.