PMC Sanitary Napkins Purchase | पुणे महापालिका आता 5 2 (2) नुसार खरेदी करणार 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स!

HomeपुणेBreaking News

PMC Sanitary Napkins Purchase | पुणे महापालिका आता 5 2 (2) नुसार खरेदी करणार 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स!

गणेश मुळे Mar 05, 2024 6:09 AM

Pune Congress | डॉक्टरांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार : मनपा आयुक्त्त विक्रमकुमार
Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme | नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात
PMC Property tax Department | मिळकतकर विभागाने पार केला 1800 कोटींचा टप्पा | मागील वर्षीपेक्षा 300 कोटी अधिक उत्पन्न

PMC Sanitary Napkins Purchase | पुणे महापालिका आता 5 2 (2) नुसार खरेदी करणार 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स!

| 93 लाख 53 हजाराचा खर्चाला स्थायी समितीची मान्यता

Pune – (The Karbhari News Service) – PMC Sanitary Napkins Purchasing) : पुणे महापालिकेच्या शाळांतील (PMC Schools) मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात येतात. मात्र याबाबतची यंदाची नॅपकिन खरेदी ची टेंडर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यामुळे प्रक्रिया रद्द  करण्यात आली होती.  त्यामुळे महापालिका अधिनियम 5 2 (2) नुसार आता महापालिका 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स ची खरेदी करणार आहे. यासाठी जवळपास 94 लाख इतका खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने (PMC Standing Committee) नुकतीच मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) शाळांतील विद्यार्थिनींना महापालिके कडून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यात येते. दरवर्षी लाखो नॅपकिन दिले जातात. यासाठी टेंडर प्रकिया राबवली जाते. कोविड काळापासून ही टेंडर प्रक्रिया बंद करण्यात आली होती. दरम्यान मागील वर्षी महापालिका प्रशासनाकडून नॅपकिन खरेदी ची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र याविषयी तक्रारी करण्यात आल्याने महापालिकेने ही निविदा प्रक्रिया रद्द केली. मात्र यामुळे मुलींना नॅपकिन मिळण्यास उशीर होत होता. त्यामुळे महापालिकेने सीएसआर फंडातून नॅपकिन्स घेतल्या होत्या. तसेच काही सामाजिक संस्थांनी पालिकेला नॅपकिन्स दिले होते. (Pune PMC News)

दरम्यान सीएसआर फंडातून मिळणाऱ्या नॅपकिन्स वजा जाता बाकी 24 लाख नॅपकिन्स महापालिका अधिनियम 5 2 (2) नुसार वैद्य व्ही अँड आय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लि नागपूर यांच्याकडून खरेदी करणार आहे. त्यासाठी प्रति नग 3.90 रु इतका दर आहे. महापालिकेने राबवलेल्या टेंडरचा दर हा 4.85 रु इतका होता. त्यामुळे संबंधित कंपनी कडून दोन वर्षासाठी नॅपकिन्स घेण्यात येणार आहेत. यात आर्थिक वर्ष 2023-24 साठी 3 लाख 42 हजार 600 नॅपकिन्स खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी 13 लाख 36 हजाराचा खर्च आहे. तर आर्थिक वर्ष 2024-25 साठी 20 लाख 55 हजार 600 नॅपकिन्स ची खरेदी केली जाईल. यासाठी 80 लाख 17 हजाराचा खर्च येणार आहे. असा एकूण 93 लाख 52 हजार 980 इतका खर्च या प्रक्रियेसाठी येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे.