PMC Road Department | अनाधिकृत रस्ते खोदाई वरून पथ विभाग आक्रमक | भोगवटापत्र, कोणत्याही प्रकारची एनओसी न देण्याचा निर्णय 

Homeadministrative

PMC Road Department | अनाधिकृत रस्ते खोदाई वरून पथ विभाग आक्रमक | भोगवटापत्र, कोणत्याही प्रकारची एनओसी न देण्याचा निर्णय 

Ganesh Kumar Mule May 27, 2025 8:28 PM

PMC Medical College Dean | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या डीन ला 10 लाखाची लाच घेताना पकडले
PMC Ward 5 – Kalyani Nagar Wadgaonsheri | प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगावशेरी | या प्रभागाने कुठला भाग व्यापला आहे | सविस्तर जाणून घ्या
Chief Minister’s instructions | ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार | पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

PMC Road Department | अनाधिकृत रस्ते खोदाई वरून पथ विभाग आक्रमक | भोगवटापत्र, कोणत्याही प्रकारची एनओसी न देण्याचा निर्णय

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरात विविध व्यक्ती तसेच बिल्डर अनधिकृत रित्या रस्ते खोदाई  (Pune Road Trenching) करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रस्ते खोदाई शुल्क न भरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यावरून आता  पथ विभाग चांगलाच आक्रमक झाला आहे. आगामी काळात असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बिल्डर आणि व्यक्तींना भोगवटापत्र, कोणत्याही प्रकारची एनओसी न देण्याचा निर्णय  पथ विभागाने घेतला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिकेत नुकतीच पथ विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे यात सुधारणा होईल अशी पथ विभागाला अपेक्षा आहे.

१. पथ विभागाचे रस्ता खोदाई शुल्क न भरता MSEDCLच्या वायर टाकणेसाठी, पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी किंवा ड्रेनेजसाठी अनाधिकृत खोदाई केल्याचे आढळल्यास संबधित विकसक / व्यक्ती यांचेकडून लेखी खुलासा मागविण्यात येणार आहे.

२. संबधित विकसक / व्यक्ती यांचेविरूध्द मनपाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात येणार आहे.

३. MSEDCLच्या वायर टाकणेसाठी, अनाधिकृत खोदाई केल्याचे आढळल्यास MSEDCL यांना सदर विकसक अथवा व्यक्ती यांना वीजजोड जोडणी न देण्याबाबत कळवावे. वीजजोड न देण्याबाबत कळवूनही वीजजोड दिल्यास त्यांचेविरूध्दही गुन्हा नोंदविण्यात येईल, तसेच मनपाचे रस्ते खोदाईचे शुल्क MSEDCL कडून वसूल करण्यात येईल, असे MSEDCL यांना कळवले जाणार आहे.

४. मनपाचे रस्ते खोदाईचे शुल्क भरलेले नसतानाही MSEDCL मार्फत वीजजोड देण्यात आल्यास सदर शुल्काची मागणी MSEDCLकडे करण्यात येणार आहे.

५. विकसकाने अनाधिकृत रित्या खोदकाम केलेले असल्यास बांधकाम नियंत्रण विभागास सदर मिळकतीस बांधकाम सुरू करणेची परवानगी अथवा भोगवटापत्र न देण्याबाबत कळवले जाणार आहे.

६. विकसकाच्या बाबतीत रस्ते खोदाई शुल्क भरल्याचे चलन असल्याशिवाय पुणे मनपाच्या कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची एनओसी संबधितास देऊ नये. याबाबतचे पत्र सर्व संबधित विभागांना तसेच क्षेत्रिय कार्यालयांना  कळविण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: