PMC Recruitment Committee | महापालिका वर्ग १ ते ३ मधील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी कर्मचारी निवड समिती गठीत!
| महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी
PMC Bharti Samiti – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) आस्थापने वरील वर्ग-१ ते वर्ग-३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरती करणेकरीता कर्मचारी निवड समिती गठीत करण्यात आली आहे. ९ लोकांची ही समिती असून अतिरिक्त आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी नुकतेच जारी केले आहेत. (Pune PMC News)
पुणे महानगरपालिका (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील कर्मचारी निवड समिती संदर्भात असलेल्या नियमास अनुसरून पुणे महानगरपालिका आस्थापनेवर वर्ग-१ ते वर्ग-३ मधील विविध पदांच्या सरळसेवेने भरती प्रक्रियेसाठी या कार्यालयीन आदेशान्वये ९ लोकांची कर्मचारी निवड समिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५४ (१) मध्ये विहित केल्यानुसार गठीत करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation Servants)
१. पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) – अध्यक्ष
२. जितेंद्र कोळंबे, (मुख्य लेखापरीक्षक) – सदस्य
३. जयंत भोसेकर, मागासवर्ग प्रतिनिधी तथा उप आयुक्त (परिमंडळ क्र. ४) – सदस्य
४. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, पुणे – सदस्य
५. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पुणे – सदस्य
६. अविनाश सकपाळ, अल्पसंख्यांक प्रतिनिधी तथा उप आयुक्त (परिमंडळ क्र. २) – सदस्य
७. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुणे – सदस्य
८. प्रतिभा पाटील, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) – सदस्य सचिव
९. संबंधित खातेप्रमुख – सदस्य
आयुक्तांनी पुढे आदेशात म्हटले आहे कि खातेप्रमुखांमध्ये अपरिहार्य कारणास्तव बदल झाल्यास संबंधित पदभार धारण करणाऱ्या अधिकारी यांनी कामकाज करावयाचे आहे. तसेच या समितीतील जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अल्पसंख्यांक प्रतिनिधी यांना पत्र पाठवून समितीच्या कामासाठी आमंत्रित करण्यात यावे.
COMMENTS