PMC puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या किनारी रंगला दांडिया

HomeBreaking Newsपुणे

PMC puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या किनारी रंगला दांडिया

कारभारी वृत्तसेवा Oct 25, 2023 3:52 PM

PMC Pension Cases | प्रलंबित पेन्शन प्रकरणाचा अतिरिक्त आयुक्त घेणार आढावा | विविध खात्यातील 493 पेन्शन प्रकरणे प्रलंबित
Extension to apply for PMC Gunvant Kamgar Award to Pune Municipal Corporation (PMC) Employees
PMC Care | महापालिकेच्या नव्या स्वरुपातील ‘पीएमसी केअर’चे उद्घाटन!

PMC puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या किनारी रंगला दांडिया 

| पुणे महानगरपालिका आयोजित पुणेरी नवरात्री फेस्ट हा विशेष कार्यक्रम 

PMC Puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या (Mula Mutha River) किनारी सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३रोजी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुणेरी नवरात्री फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुणे शहर व परिसरातील हजारो नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांनी मुळा-मुठा नदीकिनारी मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळील सॅम्पल स्ट्रेचवर हा कार्यक्रम झाला. (Pune Municipal Corporation) 

 

पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळ ३०० मीटरचा सॅम्पल स्ट्रेच तयार करण्यात आला आहे. हा सॅम्पल स्ट्रेच नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. जास्तीतजास्त नागरिकांना हा सॅम्पल स्ट्रेच पाहता यावायासाठी महानगरपालिका सॅम्पल स्ट्रेचवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. ८ सप्टेंबर २०२३ रोजी सॅम्पल स्ट्रेचवर महाविद्यालयीन तरुणांसाठी पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उपक्रमाचे आयोजन महानगरपालिकेने केले होते. महाविद्यालयीन तरुणांचा चांगला प्रतिसाद त्या उपक्रमाला मिळाला होता. तरसोमवारी महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुणेरी नवरात्री फेस्टचे आयोजन सॅम्पल स्ट्रेचवर केले होते. (PMC Pune) 

मुळा मुठा नदी किनारी नवरात्री फेस्ट हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यामागे महानगरपालिकेची एक संकल्पना होती. मुळा-मुठा नदीचा किनारा रात्रीच्या वेळीही किती सुंदर दिसू शकतोमहानगरपालिका यासाठी कसे प्रयत्न करीत आहेतहे नागरिकांना समजावेयासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिक व नदी यांच्यातील नाते  दृढ होण्यास मदत झाल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. पुणे महानगरपालिकेचे मा. अतिरिक्त आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, मा. अतिरिक्त आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारीकर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी होतनागरिकांना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली. (Pune Corporation News) 

पुणे महानगरपालिकेने यावेळी दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सेल्फी कॉर्नर३६० डिग्री फोटो बूथ तसेच विविध गेमचेही आयोजन केले होते. या सर्वांना चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला. नागरिकांना ऑन दी स्पॉट फोटो प्रिंट दिली जात होती. तसेच महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना अल्पोपहार सुद्धा देण्यात आला. अनेकांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमांचे कौतुक केले.

पुणेरी नवरात्री फेस्ट या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या कॅडेटची लक्षणीय उपस्थिती होती. जवळपास ६०० एनसीसी छात्र या उपक्रमात सहभागी झाले होते. एनसीसी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावत एनसीसी छात्रांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे अनेकांनी कौतुक करीत असा नदी किनारा प्रत्येक शहरांमध्ये होणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या.