PMC Pune Teachers | पती-पत्नी एकत्रीकरण बदलीने पुणे महापालिकेत 219 उप शिक्षकांच्या नियुक्त्या
PMC Pune Teachers | राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थातील (Local Bodies) शिक्षकांच्या बदल्या (Teachers Transfer) पती पत्नी एकत्रीकरण बदलीने केल्या जातात. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) शिक्षण विभागात (PMC Education Department) देखील असे शिक्षक रुजू करून घेतले जातात. त्यानुसार एकतर्फी तथा एकत्रीकरण बादलीने पुणे महापालिकेच्या (PMC Pune) शिक्षण विभागात 219 उप शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे( Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Teachers)
बदलीने नेमणुकीच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे
३. पुणे महानगरपालिकेकडे रुजू होणेपुर्वीचा वेतनाचा कोणताही फरक (वरिष्ठश्रेणी पदवीधर वेतनश्रेणी,निवडश्रेणी,वेतन आयोगाचा फरक व इतर तदनुषंगिक रक्कमा ) पुणे महानगरपालिकेकडून
देय राहणार नाही.
4. उपरोक्त शिक्षक रुजू झाल्यास त्यांचेवर पुणे महानगरपालिकेने ठरविलेल्या अटी/शर्ती व सेवाविषयक धोरणाबाबत होणारा बदल बंधनकारक राहतील. तसेच सदर शिक्षक पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कोणत्याही शाळेत बदली पात्र राहतील.
5. उपरोक्त शिक्षकांनी रुजू होणेपुर्वी त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रती व इतर सर्व कागदपत्रे प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडे सादर करावी.
६. उपरोक्त शिक्षकांस सदरचा आदेश प्राप्त झालेवर इकडील सेवेत रुजू होणेसाठी संबंधीत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यमुक्त करण्यात यावे.
7. सदर शिक्षकांची बदली विनंती अर्जानुसार झालेली असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता मिळणार नाही.
८. सदरची बदलीने नियुक्ती ही संच मान्यतेनुसार करण्यात येत आहे. सदर शिक्षकांना प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पुणे मनपा यांनी आपल्या स्तरावर शाळा देण्यात यावी.
9. शिक्षक रुजू झाल्यास त्यांना मे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रं
संकीर्ण-२०१८/प्र.क्र. ३८९ / नवी २० मुंबई ३२ दिनांक १६/०२/२०२१ मधील नमूद अटी शर्ती लागू राहतील.
१०. संबंधित शिक्षकांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही तफावत आढळून आल्यास सदरची बदली रद्द करून संबंधित शिक्षकांस मूळ आस्थापनेवर पाठविण्यात येईल. वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्तता करून घेण्याची जबाबदारी संबंधीत खातेप्रमुख
यांची राहील. असे आदेशात म्ह्टले आहे.