PMC Pune Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात आता  187 नवीन पदे |  पदनिर्मितीस राज्य सरकारची मंजूरी | 160 कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात आता  187 नवीन पदे |  पदनिर्मितीस राज्य सरकारची मंजूरी | 160 कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार 

Ganesh Kumar Mule Jun 07, 2023 3:52 PM

GR | Property tax | 40% मिळकत कर सवलतीबाबतचा शासन निर्णय आला | २०१९ पासून ४०% सवलतीच्या रक्कमेची वसुली पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येऊ नये
Gratuity | GR | सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन देण्याचा सरकारचा निर्णय 
Safai Karmchari | सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू | हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती

PMC Pune Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात आता  187 नवीन पदे |  पदनिर्मितीस राज्य सरकारची मंजूरी

| 160 कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार

PMC Pune Social Devlopment Department | (Author – Ganes Mule) | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागाच्या (Social Devlopment Department) वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र हे काम करण्यासाठी महापालिकेकडे पर्याप्त कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून मानधन तत्वावर काही कर्मचारी घेतले होते. मात्र या कर्मचाऱ्यांची निकड महापालिकेला सातत्याने भासू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या (Pune Civic Body) वतीने ही कामे करण्यासाठी 187 नवीन पदे (New Post) निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे (State Government) प्रस्ताव पाठवला होता. तसेच या पदांवर मानधन तत्वांवर काम करणाऱ्या 160 कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी या प्रस्तावात केली होती. या दोन्ही गोष्टीना राज्य सरकारच्या वतीने मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश (GR) देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे. (PMC Pune Social Devlopment Department)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) क्षेत्रात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या विविध कल्याणकारी योजना (Social Welfare Schemes) तसेच, महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी, महिला व बाल कल्याण, युवक कल्याणकारी, दिव्यांग कल्याणकारी या योजनेअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे महत्वाचे कामकाज समाज. विकास विभागामार्फत केले जाते. यासाठी पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागात व्यवसाय गट ” मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समुपदेशक, समूहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक या पदांवर मासिक एकवट मानधन तत्वावर कर्मचारी काम करीत आहेत. मात्र या  पदांची पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागास (PMC Social Devlopment Department) आवश्यकता असल्याने, पुणे महानगरपालिका च्या वतीने  या पदांची पदनिर्मिती करणे व त्या पदांवर या सेवकांना सामावून घेण्याबाबत मुख्य सभेने (PMC Général Body) मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी समाज विकास विभागात  १८७ पदांची पदनिर्मितीस मंजूरी मिळणे व त्या पदांवर १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला होता. कारण   पुणे महानगरपालिकेच्या सर्व पदांच्या आकृतीबंध मध्ये या पदांचा समावेश नव्हता. त्यामुळे सदर पदांची निर्मिती करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. (Pune Municipal Corporation News)

160  कर्मचाऱ्यांचे पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नियमित समायोजन करण्याबाबत खालील अटी असतील 
१) सदर कर्मचाऱ्यांची सेवा शासन निर्णयाच्या दिनांकापासून महानगरपालिकेच्या सेवेत कायम समजण्यात यावी.
२) या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्याच्या दिनांकापासून पुढे सेवेचे तद्नुषंगिक लाभ (वेतन, सेवा जेष्ठता, निवृत्तीवेतन इ.) अनुज्ञेय राहतील.
३) सदर कर्मचाऱ्यांना यापूर्वी केलेल्या सेवेचे कोणतेही लाभ अथवा थकबाकी अनुज्ञेय नाही.
४) सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरीता कोणताही निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार नाही.
५) सेवेत कायम करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडून बंधपत्र घेऊन मागील कोणताही लाभ मिळणार नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.
६) उपरोक्त समायोजन करण्यात येणारे समाज विकास विभागातील सेवक यांना स्थायी नेमणूक देतांना हजेरी
डिफॉल्ट रेकॉर्ड, चौकशी, सेवाजेष्ठता, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी निकष तपासून नियमानुसार स्थायी नेमणूक देण्यात येईल. संबंधित कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या आदेशाच्या दिनांकापासून ०६ महिन्याच्या कालावधीत चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.
७) प्रस्तावित मानधन तत्वावरील कर्मचारी यांचे वय सेवा भरती नियमांमध्ये नमूद केलेल्या वयोमर्यादे पेक्षा जास्त असल्यास वयाची व शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.
८) पुणे महानगरपालिकेने प्रस्तावासोबत पाठविलेल्या यादीतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणाचेही समायोजन या मंजूर पदांवर करता येणार नाही.
९) आस्थापना खर्च ३५ टक्के मर्यादीत राहील याची दक्षता महानगरपालिकेने घ्यावी.
१०) सदर समायोजन पूर्वउदाहरण म्हणून इतर समायोजनाच्या प्रस्तावाबाबत वापरता येणार नाही.
——
News Title-: PMC Pune Social Development Department | Now 187 new posts in Social Development Department of Pune Municipal Corporation Approval of the State Government for the creation of posts