PMC Pune SAP System | साडेसहा कोटी खर्च करून उभारलेल्या अद्ययावत  “सॅप” (SAP) चा पुणे महापालिकेत कमी वापर!

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune SAP System | साडेसहा कोटी खर्च करून उभारलेल्या अद्ययावत “सॅप” (SAP) चा पुणे महापालिकेत कमी वापर!

Ganesh Kumar Mule Oct 18, 2023 2:01 PM

Disqualified contractors in the tender process have to go to the PMC for the deposit amount!
Property Tax | PMC | 40% कर सवलत | महापालिकेचा तात्पुरता दिलासा | गरज मात्र कायमस्वरूपी निर्णयाची 
PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : फौजदारी गुन्ह्याबाबत पदोन्नती समितीच निर्णय घेणार! | महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

PMC Pune SAP System | साडेसहा कोटी खर्च करून उभारलेल्या अद्ययावत  “सॅप” (SAP) चा पुणे महापालिकेत कमी वापर!

| सजग नागरिक मंचाने उघड केला प्रकार

PMC Pune SAP System https://www.pmc.gov.in/en/circular-sap-system| साडेसहा कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या सॅप संगणक प्रणालीचा (SAP Software System) अत्यल्प वापर सुरु आहे. आणि ही अद्ययावत संगणक प्रणाली महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल ही आशा ही मावळत आहे.  यात तातडीने लक्ष घालून ही संगणक प्रणाली पूर्ण क्षमतेने वापरली जाईल आणि त्यातून निघणाऱ्या  विविध रिपोर्ट्स चा उपयोग करून सर्व कामे जलद , अचूक व इंटिग्रेटेड स्वरुपात होतील यासाठी पावले उचलावीत व जनतेच्या करांच्या पैशातून झालेला साडेसहा कोटी रुपयांचा खर्च कारणी लागेल यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar https://www.tirubaa.edu.in/uploads/advisoryboard/Vivek-Velankar-Profile.pdf) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.
विवेक वेलणकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार   पुणे महापालिकेने २०१७ साली जगभरात नावाजलेली अद्ययावत संगणकप्रणाली सॅप ( SAP) बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे नोव्हेंबर २०१७ मध्ये याचे काम सुरु झाले. त्याकरीता ” ऍटाॅस ओरीजिन” या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली होती. त्यांना एक वर्षात संगणक प्रणाली बसवणे व नंतर चार वर्षे सपोर्ट करणे हे काम दिले गेले. (Pune Municipal Corporation)
 फायनान्स व मटेरियल्स असे दोन मोड्यूल्स बसवण्याचे ठरवले होते.  त्या कंपनीने काम काही प्रमाणात पूर्ण केले आणि ही सिस्टीम १ एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात आली. खरंतर अशी अद्ययावत संगणकप्रणाली बसवून झाल्यावर २-३ महिने जुनी संगणक प्रणाली आणि नवी संगणक प्रणाली एकाच वेळी चालवायची असते व त्यातून नवीन प्रणाली मध्ये आवश्यक त्या सुधारणा करायच्या असतात आणि मग नवीन प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित करुन‌ जुनी संगणक प्रणाली वापरणे पूर्णपणे बंद करणे आवश्यक असते. मात्र आज दीड वर्ष झालं तरी अजून दोन्ही प्रणाली वापरणे सुरुच आहे. भांडार विभाग ही नवीन सॅप प्रणाली वापरतच नाही तर फायनान्स विभाग या प्रणालीचा अल्प वापर करतो आहे. सॅप या संगणक प्रणालीचा मुख्य गाभा म्हणजे त्यांची उत्तम रिपोर्टींग सिस्टीम , ( अगदी बॅलन्स शीट सुद्धा दोन दिवसांत तयार होतो )पण आजही त्यासाठी ही प्रणाली महापालिकेत वापरली  जात नाही. त्यात जी कंपनी गेले सहा वर्षे हे काम करते आहे त्यांचे कंत्राट ३१ मे २०२३ रोजी संपुष्टात आले आहे. त्यामुळे या सॅप प्रणाली वापरण्यासाठी काही अडचणी असतील , काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही आहे. (PMC Pune)
वेलणकर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कि एकूणातच आजवर साडेसहा कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या संगणक प्रणालीचा अत्यल्प वापर सुरु आहे. आणि ही अद्ययावत संगणक प्रणाली महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल ही आशा ही मावळत आहे.
—-
महापालिका आयुक्तांनी  यात तातडीने लक्ष घालून ही संगणक प्रणाली पूर्ण क्षमतेने वापरली जाईल आणि त्यातून निघणाऱ्या  विविध रिपोर्ट्स चा उपयोग करून सर्व कामे जलद , अचूक व इंटिग्रेटेड स्वरुपात होतील यासाठी पावले उचलावीत व जनतेच्या करांच्या पैशातून झालेला साडेसहा कोटी रुपयांचा खर्च कारणी लागेल यासाठी प्रयत्न करावेत.
–  विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच