PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 127 पाल्यांचा सोमवारी केला जाणार सन्मान

HomeपुणेBreaking News

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 127 पाल्यांचा सोमवारी केला जाणार सन्मान

कारभारी वृत्तसेवा Oct 27, 2023 1:05 PM

PMC Pune Marathi News | मुख्य कामगार अधिकारी म्हणून आता अरुण खिलारी काम पाहणार
PMC Pune Chief Labour Officer | अरुण खिलारी यांची पुणे महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नती
PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा केला जाणार सन्मान | 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 127 पाल्यांचा सोमवारी केला जाणार सन्मान

PMC Employees and Officers | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट देण्यात आला होता.  त्यानुसार येत्या सोमवारी 127 पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी यांनी दिली. (PMC Employees and Officers)

माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित आहे. कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सन्मान केला जातो. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सामग्री दिली जाते. दरम्यान यासाठी अर्ज करण्यासाठी 24 ऑगस्ट ची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने याची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
यात पात्र ठरलेल्या 127?पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये 10 विच्या 96 आणि 12 विच्या 31 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बक्षीस म्हणून या विद्यार्थ्यांना दप्तर आणि पेन ड्राइव्ह दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटीचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय उपयोगी सामग्री दिली जाते. तसेच त्यांच्यासाठी तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान ठेवले जाते. या व्याख्यानाचा लाभ सन्मानास पात्र ठरलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी घ्यावा. शिवाय ज्यां कर्मचाऱ्यांची  मुलं आता 10 आणि 12 वी ला आहेत त्यांनी देखील व्याख्यानाचा लाभ घेण्यासठी यावे.
अरुण खिलारी, मुख्य कामगार अधिकारी.
—-