PMC Pune Polio Vaccine Schedule | पुणे महापालिका कार्यक्षेत्रात पोलिओ लसीकरण मोहीम 9 मार्च पर्यंत चालणार 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Polio Vaccine Schedule | पुणे महापालिका कार्यक्षेत्रात पोलिओ लसीकरण मोहीम 9 मार्च पर्यंत चालणार 

गणेश मुळे Mar 03, 2024 12:38 PM

PMC Vaccination | पुणे महानगरपालिकेच्या लस साठा साठविणेकरिता वॉक इन कुलर यंत्रणा कार्यरत 
PMC Health Department | सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल! | शहरी गरीब, CHS चे कामकाज डॉ वावरे यांच्याकडे, PCPNDT, एमटीपी डॉ बळिवंत यांना तर डॉ जाधव यांच्याकडील NUHM डॉ नाईक यांच्याकडे
Walk-in cooler system for storing vaccine stock of Pune Municipal Corporation is working

PMC Pune Polio Vaccine Schedule | पुणे महापालिका कार्यक्षेत्रात पोलिओ लसीकरण मोहीम 9 मार्च पर्यंत चालणार

| पुणे महापालिका आरोग्य विभागाची माहिती

पुणे – (The Karbhari News Service) – PMC Polio Vaccine Schedule | राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२४ (National Pulse Polio Vaccination 2024) प्रथम फेरीमध्ये पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 0 ते ५ वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम २०२४ ही ३ मार्च ते ९ मार्च २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Health Department)
रविवार ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ दिवसानिमित्त पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात १३६२ पोलिओ बूथद्वारे ते ५ वयोगटातील सुमारे २,९८,७८४ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.  या मोहिमेत १५ हेड सुपरवायझर ,३१३ पर्यवेक्षक, १९१२ पथके कार्यरत असून मुख्यालय स्तरावरून सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी व आरोग्य अधिकारी यांचे सनियंत्रण असणार आहे. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे व २९ नवीन एच. डब्लू.सी अंतर्गत बूथव्दारे तसेच वीटभट्ट्या स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे, अतिजोखमिचे भाग या ठिकाणी बुथ लावण्यात आले होते, प्रवासात असणाऱ्या बालकांना पोलिओ लस देण्यासाठी बस स्थानके, एस टी स्थानके, मेट्रो स्टेशन,रेल्वे स्टेशन,एयर पोर्ट, उद्याने या ठिकाणी ट्रान्झीट टीम कार्यरत होती.
४ मार्च २०२४ ते ९ मार्च २०२४ ( ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्रीची सुट्टी वगळता ) या कालावधीत IPPI मोहिमेअंतर्गत १०,३५,३३५ इतक्या घरांना गृहभेटी देवून बुथवर डोस दिला गेल्याची खात्री करून घेतली जाणार आहे.
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेची पूर्व तयारी करण्यात आली. रविवार दि ३ मार्च २०२४ रोजी पुणे महानगरपालिका पल्स पोलिओ मोहिमेचे उदघाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त मा श्री रविंद्र बिनवडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी कै कलावतीबाई मावळे दवाखाना, २८३, नारायण पेठ पुणे ३० या ठिकाणी उपस्थित बालकांना माननीय यांचेकडून प्रातिनिधिक स्वरुपात पोलिओचे डोस देण्यात आले.
याप्रसंगी मे. राज्य शासनाकडील सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा उप राज्य लसीकरण अधिकारी मा श्री डॉ. प्रवीण वेदपाठक, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मा श्री डॉ. भगवान पवार उप-आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर,शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रशांत बोठे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ चेतन खाडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गोपाल उज्वणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जगदाळे व डॉ. प्रदीप पवार, लसीकरण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उदघाटन सभारंभानंतर उपरोक्त नमूद आरोग्याधिकारी यांनी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध दवाखाने, झोपडपट्टी ट्रान्झीट बूथ या ठिकाणी भेटी देवून मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या कामाचे पर्यवेक्षण करून संबंधिताना सूचना दिल्या. आरोग्य अधिकारी मा. श्री भगवान पवार यांनी बूथच्या दिवशी ९५ टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न करावे अशा सूचना केल्या.
आपल्या परिसरातील पोलिओ सेंटर आणि अंगणवाडी सेविका यांची माहिती इथे जाणून घ्या