PMC Pune Employees Transfer | बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचा अजूनही अहवाल नाही
| खातेप्रमुखांना धरले जाणार जबाबदार
PMC Pune Employees Transfer | महापालिका प्रशासनाकडून विविध खात्यातील कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या (PMC Pune Employees Transfer) करण्यात आल्या आहेत. मात्र बरेच कर्मचारी आपल्या मूळ खात्यातच काम करत होते. याबाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी कडक धोरण अवलंबत बदलीच्या जागी रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचा बदली झालेल्या जागी रुजू होण्याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले होते. मात्र तो अहवाल देखील अजून काही खात्यांनी दिलेला नाही. हा अहवाल तत्काळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत खातेप्रमुखांना जबाबदार धरून अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रार केली जाईल. असा इशारा सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. (PMC Pune Employees Transfer)
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील व प्राथमिक शिक्षण विभागाकडील विविध हुद्यावरील अधिकारी / कर्मचारी यांची पदस्थापनेने नियुक्ती व नियतकालिक बदली करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधितांनी पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये तात्काळ हजर होणेबाबत आज्ञापत्रांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तथापि, असे निदर्शनास आले आहे की संबंधित अधिकारी / कर्मचारी आज्ञापत्रांनुसार
पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये हजर न होता अजूनही त्यांच्या मूळ खात्यात कामकाज करीत होते.
याबाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी कडक धोरण अवलंबत बदलीच्या जागी रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचा बदली झालेल्या जागी रुजू होण्याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले होते. मात्र तो अहवाल देखील अजून काही खात्यांनी दिलेला नाही. त्यामुळे याबाबत खातेप्रमुखांना जबाबदार धरून अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रार केली जाईल. असा इशारा सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. (PMC Pune News)