PMC Pune Employees | 23 समाविष्ट गावापैकी 8 गावांतील 76 कर्मचार्यांना महापालिका वेतनश्रेणी लागू
PMC Pune Employees | समाविष्ट 23 गावांमधील ४०८ कर्मचाऱ्याना याअगोदरच महापालिकेच्या सेवेत समाषिष्ट करुन घेण्यात आले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात आठ गावांच्या 76 कर्मचाऱ्यांना महापालिका वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune | PMC pune Employees)
महापालिकेच्या हद्दीमध्ये (Pune Municipal Corporation Limits) गावांचा समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी महापालिकेच्या सेवत घेण्यात आले. जिल्हाप्रशासनाकडून तपासणी करुन हे कर्मचारी महापालिकेच्या सेवत २०२१ ला घेण्यात आले होते. मात्र त्यांना ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे मानधनच देण्यात येत होते. लेखापरिक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर सध्या ८ गावांमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेची वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनामधील फरक सुध्दा मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune PMC Employees)
महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले मनपा सेवत या कर्मचाऱ्याना घेण्यात आले होते. मात्र त्यांना वेतन महापालिकेच्या नियमानुसार मिळत नव्हते. त्यामुळे आता सुधारीत वेतन श्रेणी आठ गावातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलीअसून एका महिन्यामध्ये सुधारीत वेतन श्रेणी लागू करण्यात येईल. (PMC Pune News)
गाव सेवक संख्या
किरकटवाडी 21
सुस. 15
औताडे हांडेवाडी 6
महाळुंगे 17
नांदोशी सनसनगर 3
जांभूळवाडी कोळेवाडी 5
कोपरे 5
वडाचीवाडी 4
——-
News Title | PMC Pune Employees | Municipal pay scale applicable to 76 employees of 8 villages out of 23 covered villages