PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार 

Ganesh Kumar Mule May 03, 2023 2:49 PM

Pune Municipal Corporation Schools | पुणे महापालिका शाळांमध्ये 1 ऑगस्ट पासून आरोग्य अभियान
IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास
Dilip Vede Patil | एनडीए चौकात (चांदणी चौक) उभारण्यात आलेल्या अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राला स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे नाव देण्याची मागणी

PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार

| अनुपस्थित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्ताचे आदेश

PMC Pune Employees | महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या (Maharashtra Day) निमित्ताने महापालिकेत 1 मे रोजी  ध्वजारोहनाच्या कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी पालिकेच्या मुख्य इमारती मधील सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याबाबतचे आदेश आधीच देण्यात आले होते. याबाबत ‘द कारभारी’ (The Karbhari) वृत्तसंस्था कडून वृत्त देखील प्रसारित करण्यात आले होते. मात्र  कार्यक्रमासाठी अवघे दोनशे कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. तर, ध्वजारोहनाची वेळ झाली तरी अनेक कर्मचारी उशिरा आल्याने गर्दीच नव्हती. त्यामुळे, संतापलेल्या महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner Vikram Kumar) अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Pune Employees News)

काय होते आदेश!

महापालिका आयुक्तांच्या (IAS Vikram Kumar) आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त (Maharashtra Diwas) आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांची उपस्थित अनिवार्य आहे. या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील सेवकांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी / सेवकांची उपस्थिती घेण्यात यावी व उपस्थितीचा अहवाल सर्व खातेप्रमुख यांनी न चुकता दिनांक ४/५/२०२३ पर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. ज्या अधिकारी / सेवकांना ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून तसे लेखी प्रमाणपत्र खातेप्रमुखांकडे सादर करावे. (PMC Administrator Vikram Kumar)

तरी, सर्व संबंधितांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले होते. (Maharashtra State Anniversary)


मुख्य इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना हा कार्यक्रम अनिवार्य होता, मात्र, मुख्य इमारतीमधील अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ दिडशें ते दोनशें कर्मचारीच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यातही सुरक्षा विभाग तसेच महापालिकेच्या विभाग प्रमुखांची संख्या अधिक होती. त्यामुळे, कार्यक्रमाच्या वेळेसच आयुक्त कुमार यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी, संबधित अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत अनुपस्थित राहिलेल्या सर्वांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.