PMC Pune Education Department | आता शिक्षण विभागातील कामचुकार सुरक्षा रक्षकावर राहणार करडी नजर 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Education Department | आता शिक्षण विभागातील कामचुकार सुरक्षा रक्षकावर राहणार करडी नजर 

Ganesh Kumar Mule May 10, 2023 2:38 PM

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत
Mahila Ayog Aplya Dari | पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी
Contract workers | PMC pune | कंत्राटी कामगारांची इशारा सभा | राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

PMC Pune Education Department | आता शिक्षण विभागातील कामचुकार सुरक्षा रक्षकावर राहणार करडी नजर

| पुणे महापालिकेकडून जबाबदार अधिकारी नियुक्त

PMC Pune Education Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्राथमिक शिक्षण विभागाकडे (Primary education department) कार्यरत असलेल्या कायम सुरक्षा रखवालदार व रोजंदारी सुरक्षा रखवालदार यांचेवर आता महापालिकेची करडी नजर राहणार आहे. काही लोक कामचुकारपणा करत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.  या लोकांवर  परिणामकारक नियंत्रण ठेवणेसाठी  राकेश य. विटकर, सुरक्षा अधिकारी पुणे महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation News)

 राकेश विटकर, यांनी खालील  बाबींच्या अनुषंगाने कामकाज करावयाचे आहे. असे आदेशात म्हटले आहे. 
१) प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुरक्षा रखवालदारांची नेमणूकीच्या ठिकाणांची तपासणी करुन मान्य संख्येमधूनच सर्व प्राथमिक शाळांना सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन देण्याची दक्षता घ्यावी.
२) कोणतीही प्राथमिक शाळा विना सुरक्षा रखवालदार राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
३) प्रत्येक शाळेतील सुरक्षा रखवालदार यांच्या कामाची जबाबदारी निश्चित करुन देण्यात यावी.
४) सदर सुरक्षा रखवालदार यांची तिनही पाळ्यांमध्ये उपस्थिती तपासावी, तसेच सदर सुरक्षा रखवालदार विहीत वेळेत पूर्णवेळ उपस्थित असतात अगर कसे ? याबाबत तपासणी करावी.
५) सदर सुरक्षा रखवालदार हे मान्य गणवेश परिधान करीत आहेत अगर कसे? याबाबत तपासणी करावी.
६) सुरक्षा विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडे कार्यरत असलेल्या प्रभारी सहाय्यक सुरक्षा अधिकारी व प्रभारी सुरक्षा जमादार यांचेमार्फत प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुरक्षा रखवालदार यांचे कामकाजावर देखरेख करणे, नियंत्रण ठेवणे, तसेच वेळोवेळी कामकाजाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देण्याची कार्यवाही करावी.
७) वरिल बाबींच्या अनुषांने केलेल्या कामकाजाचा अहवाल श्री. राकेश विटकर यांनी दरमहा अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पुणे महानगरपालिका, यांचेकडे सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे.
——
PMC Pune Education Department |  Now the evil eye will be on the security guard in the education department