PMC Pune Bharti Results | फायरमन पदाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेकडून छाननी पथक नियुक्त 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Bharti Results | फायरमन पदाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेकडून छाननी पथक नियुक्त 

Ganesh Kumar Mule Jul 13, 2023 2:16 PM

Hoarding | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत होर्डिंग वर कारवाई
NCP Youth Congress | महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..? | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन
Water problem of Baner-Balewadi-Sus-Mhalunge | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!

PMC Pune Bharti Results | फायरमन पदाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेकडून छाननी पथक नियुक्त

PMC Pune Bharti Results | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांची भरती प्रक्रिया (PMC Recruitment) राबवण्यात येत आहे. यातील सर्वच पदांचे नुकतेच निकाल घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. फायरमन (Fireman) पदांच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 30 लोकांचे छाननी पथक म्हणजे 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत. तर या टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी 7 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान उमेदवारांनी १९ ते २१ जुलै या कालावधीत पडताळणी साठी सकाळी १० वाज्लेपासून महापालिकेत उपस्थित राहायचे आहे. (PMC Pune Bharti Results)

पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील श्रेणी – १ ते श्रेणी- ३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता ०६/०३/२०२३ रोजी जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरातीनुसार प्राप्त अर्जातील महाराष्ट्रातील एकूण ५ शहरांमध्ये वेगवेगळ्या परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा IBPS संस्थे मार्फत घेण्यात आली आहे. IBPS संस्थेकडून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे कामी संबंधित उमेदवारांची शैक्षणिक व इतर अर्हता / पात्रतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रांची तपासणी करणेकामी खालीलप्रमाणे छाननी पथक नियुक्त करण्यात आले आहे. अग्निशमन विमोचक / फायरमन श्रेणी – ३ या पदासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री देवेंद्र पोटफोडे (अग्निशमन विभाग ) यांचे नियंत्रणाखाली 10 पथकांनी प्रमाणपत्रे / कागदपत्रांच्या पडताळणीचे कामकाज करावयाचे आहे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)

 छाननी पथकाने उद्या  जुना जी.बी. हॉल येथे दुपारी १२.०० वाजता प्रशिक्षणास उपस्थित राहून संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीकरिता १९ जुलै, २० जुलै आणि २१  जुलै म्हणजे येत्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार रोजी जुना जी.बी. हॉल येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहून संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे. छाननी पथकाने केलेल्या अर्जाच्या छाननीचा अहवाल रोजचे रोज मा उप आयुक्त (सा.प्र.) यांचेकडे सादर करावयाचा आहे आणि नियुक्त केलेल्या छाननी पथकाने उमेदवारांच्या कागदपत्रा आधारे केलेल्या छाननीचा अंतिम अहवाल दोन दिवसात सदस्य सचिव, कर्मचारी निवड समिती तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन) यांचे मार्फत मा. अति. महापालिका आयुक्त (ज) यांना सादर करावयाचा आहे.  उमेदवाराने सादर केलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबतची कागदपत्रे काळजीपूर्वक तपासण्याची जबाबदारी ” प्रशासन अधिकारी, अधिक्षक, वरिष्ठ लिपिक व लिपिक टंकलेखक ” संवर्गातील सेवकावर आहे.  उमेदवाराने केलेला अर्ज, जात प्रमाणपत्र, वय, समांतर आरक्षणाचा दावा, नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास बाबतचे प्रमाणपत्र इ. बाबतची कागदपत्रे तपासून अर्ज पात्र होतो अगर कसे याची पडताळणी लेखनिकी संवर्गातील प्रशासन अधिकारी, अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपीक टंकलेखक यांनी करावयाची आहे. प्रशिक्षणास संबंधितानी वेळेवर उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. जे सेवक प्रशिक्षणास व प्रत्यक्ष कामकाजास अनुपस्थित राहतील त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करणेत येईल. असा इशारा देखील देण्यात आला आहे.
—–
News Title |PMC Pune Bharti Results | Scrutiny team appointed by Municipal Corporation to verify the documents of eligible candidates for the post of Fireman