PMC Pune Bharti | पुणे महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर (उप नगरसचिव), सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सह विविध पदांची भरती!

Homeadministrative

PMC Pune Bharti | पुणे महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर (उप नगरसचिव), सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सह विविध पदांची भरती!

Ganesh Kumar Mule Feb 14, 2026 8:49 AM

PMC Employees | समाविष्ट गावातील 626 कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत राज्य सरकार स्तरावर निर्णय प्रलंबित! | 403 कर्मचाऱ्यांचा फेरचौकशी अहवाल शासनाला पाठवणार
PMC Pune Assistant Commissioner | महापालिका सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल
PMC Employee Anant Nimbalkar | गेली 20 वर्षे मुख्य सभेचा झेंडा लावण्याची जबाबदारी निष्ठेने पार पडणारे अनंत निंबाळकर सेवानिवृत्त!

PMC Pune Bharti | पुणे महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सह विविध पदांची भरती!

 

 

Pune Municipal Corporation Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील विविध संवर्गातील एकाकी पदांची सरळसेवा भरती केली जाणार आहे. प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, अशा एकूण १३ पदाची भरती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला आहे. नुकतीच या प्रस्तावाला स्थायी समितिने मान्यता दिली आहे. आता १८ तारखेच्या मुख्य सभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे. (Pune Corporation Recruitmet)

 

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेतील विविध संवर्गातील ही आहेत  एकाकी पदे आणि त्यांची केली जाणार आहे भरती

१) त्वचारोग तज्ञ (वर्ग-१) – एस २३

२) एड्स नोडल ऑफिसर (वर्ग-१) – एस २३

३) न्यूरोसर्जन (वर्ग-१) – एस २३

४) युरोसर्जन (वर्ग-१) – एस २३

५) रक्तसंक्रमण अधिकारी (वर्ग-१) – एस २३

६) अॅनेस्थेटीस्ट (अॅनेस्थेटिक रजिस्ट्रार) (वर्ग-२)  – एस २०

७) जीवशास्त्रवेत्ता (वर्ग-२) – एस १५

८) उप मुख्य अग्निशमन अधिकारी (वर्ग-१)  – एस १७

९) विभागीय अग्निशमन अधिकारी (वर्ग-२) – एस १७

१०) सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी (वर्ग-२) – एस १६

११) राजशिष्टाचार अधिकारी (प्रोटोकॉल ऑफीसर) (उप नगरसचिव (वर्ग-२) – एस १५

१२) सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी (वर्ग-३) – एस १४

१३) मत्सालय पर्यवेक्षक /अॅक्वेरियम असिस्टंट (वर्ग-३) – एस ८

 

परीक्षेचे स्वरूप :-

अ) कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करावी लागेल. प्रत्येक प्रश्नास एकूण (१०० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात येतील.
ब) ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गट – ब (अराजपत्रित), गट – क व गट – ड मधील अन्य सर्व पदांकरीता उमेदवारांची निवड करताना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून २०० गुणांची परीक्षा घेण्यात यावी. अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवतेनुसार शिफारस करण्यात येईल.
इ) ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अहर्ता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.

ऑनलाईन परीक्षा :

पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागाचे पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

१) उपरोक्त २०० गुणांच्या ऑनलाईन पध्दतीने होणा-या परीक्षेसाठी एकत्रितपणे २ तासांचा कालावधी अनुज्ञेय राहील.
२) ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, भाषा, सामान्यज्ञान, बुध्दिमत्ता चाचणी, तांत्रिक ज्ञान यांचेशी संबंधित राहील. उपरोक्त वर्ग-१ ते वर्ग-३ पदाकरीता २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

शासन निर्णयातील नमूद तरतुदीनुसार प्रवेश शुल्क – – खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु १०००/-, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु ९००/-

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील टप्पा क्र. ३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य, (वर्ग-३) मधील १६९ पदे, मे. IBPS संस्थेमार्फत भरती प्रक्रिया चालू आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील  वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त पदे प्राधन्यक्रम निश्चित करून IBPS संस्थेमार्फत मागील तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया पाहता पुढील टप्प्यातील भरती प्रक्रिया IBPS संस्थेस देणे उचित ठरेल. असे प्रस्तावात म्हटले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0