PMC Pune Assistant Commissioner | महापालिका  सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Assistant Commissioner | महापालिका सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल

Ganesh Kumar Mule May 06, 2023 6:34 AM

City Hawkers Committee Election | नगर पथविक्रेता समिती  निवडणुकीसाठी येणार २८ लाखाचा खर्च!
Pune Water Cut | शनिवारी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद! 
Road Development Works | पुणे शहरासह जिल्ह्यात 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरु : नितीन गडकरी

PMC Pune Assistant Commissioner | महापालिका  सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल

 

| वर्ग 3 मधील पदविका (Diploma) मिळवलेला कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक महापालिका आयुक्त

| विधी समिती समोर प्रस्ताव

PMC Pune Assistant Commisioner | महापालिकेच्या सहायक महापालिका आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार बदल केला जात आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या (Promotion) पद्धतीत बदल केला गेला होता. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार (Seniority) 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात बदल करण्यात आला. त्यानुसार पदवी धारण करणारे अंतर्गत परीक्षेद्वारे वर्ग 1, 2 आणि 3 मधील कर्मचारी देखील सहायक आयुक्त होऊ शकतात. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या मुख्य सभेने (pmc pune General body) मान्यता दिली होती व हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. मात्र यात अजून एक बदल केला जाणार आहे. आता फक्त पदवीच (Degree) नाही तर पदविका (Diploma) धारण करणारा कर्मचारी देखील परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. मात्र या माध्यमातून लेखनिकी संवर्गातून (clerical cadre) सहायक आयुक्त (Assistant Municipal commissioner, होण्याची मनीषा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदखल केले असल्याचे दिसून येत आहे. (PMC pune Assistant commissioner)
महापालिका सेवा नियमावली (PMC pune Service rules) नुसार सहायकमहापालिका आयुक्त पदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकी संवर्गासाठी अधीक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे. (PMC pune news)

त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील  सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित  पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमावली २०१४ मध्ये “लिपिक टंकलेखक”, वर्ग ३ ते “उप आयुक्त”, वर्ग १ अशी पदोन्नतीची लॅडर आहे. सदर साखळीमधील “सहाय्यक महापालिका आयुक्त”, वर्ग १ हे पद २५% नामनिर्देशन, ५०% पदोन्नती ( नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणा-या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे प्रशासन अधिकारी (विभाग प्रमुख) संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून किमान ०३ वर्षांचा अनुभव)  व २५% प्रतिनियुक्ती मधून भरण्यात येते. (Pmc Pune Marathi News)
मात्र  पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये परिशिष्ट-१ मधील अट
क्रमांक ९ पुढील प्रमाणे आहे.
तांत्रिक पदांना अतांत्रिक संवार्गामध्ये पदोन्नती देता येणार नाही.
 पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये “सहाय्यक महापालिका आयुक्त, वर्ग-१” या पदांच्या विहित करण्यात आलेली नेमणुकीची पद्धत, टक्केवारी व शैक्षणिक अर्हतेबाबत खालीलप्रमाणे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यानुसार आता नवीन पद्धत अशी केली होती
1. नामनिर्देशन – २५%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.
3. प्रतिनियुक्ती- २५%
महानगरपालिका शासकीय  सेवेतील / स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील वर्ग-१ या पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव धारण करणारे अधिकाऱ्यांमधून. (Pmc Pune news)
हा प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र यात अजून एक बदल करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. प्रस्तावानुसार नवीन पद्धत खालीलप्रमाणे असेल.
1. नामनिर्देशन – २५%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पूर्ण वेळ पदवी/पदविका
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पूर्ण वेळ पदवी/पदविका धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.
3. प्रतिनियुक्ती- २५%
महानगरपालिका शासकीय  सेवेतील / स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील वर्ग-१ या पदावरील किमान ०५ वर्षांचा अनुभव धारण करणारे अधिकाऱ्यांमधून. (Pmc Pune assistant commissioner News)