PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे!

HomeपुणेBreaking News

PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे!

Ganesh Kumar Mule Oct 17, 2023 2:13 AM

Additional Commissioner Vikas Dhakne | विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार | १४ खात्यांचे कामकाज सोपवले
Bogus Doctor Meeting PMC | समाविष्ट गावातील बोगस डॉक्टर शोधण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाची मोहीम!
PMC Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडील कामकाज व्यवस्थेत बदल!

PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी सरकारकडे!

| महापालिका अधिकाऱ्यांना यावेळेस तरी मिळणार का पद?

PMC Pune Additional Commissioner | पुणे | महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मागील वेळेस हक्काचे असताना महापालिका अधिकाऱ्यांच्या (PMC Officers) हातून हे पद निसटले होते. काही काळाने हे पद रिक्त होणार आहे. या पदावर महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार आहे. यासाठी अधिकारी पात्र होत आहेत. या अधिकाऱ्यांची यादी महापालिका सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांचा समावेश आहे. यामधून कुणीतरी एक निवडला जाणार आहे, जो निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मात्र प्रशासकीय सूत्रानुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Chief Account and Finance Officer Ulka Kalaskar) यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. असे असले तरी अंतिम निर्णय हा राज्य सरकारचाच असणार आहे. (Pune Municipal Corporation)
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्तपद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पदरिक्त झाले होते. त्यानुसार महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पदनियुक्त केले जाणार आहे. यासाठी बरेच जण पात्र ठरत होते. मात्र राज्य सरकारने महापालिका अधिकाऱ्यांना हे पद न देता विकास ढाकणे यांच्या रूपाने सरकारचा अधिकारी या पदावर दिला आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या हातून हे पद निसटले होते. (PMC Pune)
सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीनुसार यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल  यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. याआधी 6 नावे होती. यामध्ये शिवाजी दौंडकर आणि विवेक खरवडकर यांचा समावेश होता. मात्र हे दोघेही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे 4 पैकी कुणा एकाची वर्णी लागू शकते. दरम्यान यासाठी कळसकर यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. त्यांच्याकडून तसे प्रयत्न देखील केले जात आहेत. कारण बाकी तीन अधिकाऱ्यांना खूप कमी कालावधी मिळतो. हे सर्व वर्षभराच्या आत सेवानिवृत्त होत आहेत. तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी राज्य सरकारने प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे हे पद आता नियमानुसार विभागले जाईल. त्यामुळे कळसकर आता अतिरिक्त आयुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान हे पद रिक्त झाल्यानंतर निर्णय हा राज्य सरकारच घेणार आहे. (PMC Additional Commissioner)
——-