PMC PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याचा उद्याचा शेवटचा दिवस    | मिळकत करातून महापालिकेला 1630 कोटींचे उत्पन्न प्राप्त

HomeपुणेBreaking News

PMC PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याचा उद्याचा शेवटचा दिवस | मिळकत करातून महापालिकेला 1630 कोटींचे उत्पन्न प्राप्त

कारभारी वृत्तसेवा Nov 29, 2023 1:23 PM

Ajit Deshmukh | थकबाकी असलेल्या 121 मिळकती टॅक्स विभागाने केल्या सील  | उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती 
Property Tax Recovery | चेक बाऊन्स झाला तर आता थेट मिळकत सील केली जाणार! | महापालिका मिळकत कर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात
PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त सचिन इथापे आणि अजित देशमुख यांची बदली 

PMC PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याचा उद्याचा शेवटचा दिवस

| मिळकत करातून महापालिकेला 1630 कोटींचे उत्पन्न प्राप्त

PMC PT 3 form | Pune Property tax | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर आकारणी विभागाचे फॉर्म PT-3 (PMC Property tax Department PT 3 Form) भरून देण्याची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपत होती.  मात्र दिवाळीची सुट्टी आणि नागरिकांची मागणी पाहता ही मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान या कालावधीत महापालिकेकडे 2 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property tax Department PT 3 Form)
  पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येत आहे. (PMC property Tax)
वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना दि. ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज (PT 3application form) संपूर्ण पुराव्यांसह १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन (pmc pune property Tax department) खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता
दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. दरम्यान ही मुदत आता महापालिका प्रशासनाने वाढवली आहे. आता ही मुदत 30 नोव्हेंबर असणार आहे. दिवाळीची सुट्टी आल्याने नागरिकांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. मात्र ही मुदत आता उद्या संपत आहे.  (Pune property tax)

| पुन्हा मुदत वाढवण्याची दीपाली धुमाळ यांची मागणी

दरम्यान PT 3 अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत धुमाळ यांनी पत्र दिले आहे. पत्रानुसार महापालिकेकडे 2 लाख लोकांनी PT 3 अर्ज भरले आहेत. अजून 1 लाख लोकांना अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे मुदत वाढवण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.

| महापालिकेला 1630 कोटींचे उत्पन्न

पुणे महापालिकेला मिळकत करातून 1630 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. आजच्या एकाच दिवशी 17 कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान कर आकारणी आणि कर संकलन विभागाने कर वसुलीवर चांगलाच जोर दिला आहे.