PMC PT – 3 Application – PT-3 अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवली | 40% सवलतीबाबत महापालिकेने घेतले महत्वपूर्ण निर्णय | जाणून घ्या 

HomeBreaking Newsपुणे

PMC PT – 3 Application – PT-3 अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवली | 40% सवलतीबाबत महापालिकेने घेतले महत्वपूर्ण निर्णय | जाणून घ्या 

गणेश मुळे Jun 19, 2024 2:34 PM

Pune Property tax Department | पुणे महापालिका आयपीसी कलम १३८ चा करणार वापर | जाणून घ्या कुणा विरुद्ध वापरले जाते कलम आणि शिक्षा!
PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागला लवकरच मिळणार 200 कर्मचारी!
Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1068 कोटींचे उत्पन्न 

PMC PT – 3 Application – PT-3 अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवली | 40% सवलतीबाबत महापालिकेने घेतले महत्वपूर्ण निर्णय | जाणून घ्या

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील ज्या मिळकतींची 40% सवलत जी. आय. एस. सर्व्हे अंतर्गत 1 एप्रिल 2018 पासून रद्द करण्यात आली. तसेच ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी 40% सवलत न देता 1 एप्रिल 2019 पासून पुढे झालेली आहे, अशा मिळकतींधारकांसाठी पुणे महानगरपालिने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यातील सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय हा आहे कि, PT-3 अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune Property Tax)
पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी मिळकतींना स्वतः वापर करीत असल्यास 40% सवलत दिली जाते. त्यानुसार स्वतः वापर करीत असलेल्या मिळकतधारकांकडून PT-3 अर्ज भरून घेऊन 40% सवलत देण्याची कार्यवाही केली जाते.
निवासी मिळकतींची 40% सवलत जी. आय. एस. सर्व्हे अंतर्गत 1 April 2028 पासून 96122 मिळकतींची रद्द करण्यात आली होती. तसेच नव्याने बांधकाम झालेल्या 198296 निवासी मिळकतींची आकारणी 40% सवलत न देता 1 April 2029 पासून पुढे झालेली आहे. तसेच नव्याने समाविष्ट 23 गावामधील 1,68,771 मिळकतींनाही सवलत दिलेली नाही अशा एकूण 4,63,189 मिळकतींना 40% सवलत मिळालेली नाही.
वरील सर्व मिळकतीना 40०% सवलत काढण्याची देयके वितरीत केल्यानंतर बऱ्याच नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी व लोकप्रतिनिधी यांनी स्वतः राहत असून देखील सर्व्हेमध्ये 40% सवलत काढली असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे 21 april 2023  रोजीच्या शासन निर्णयानुसार 40०% सवलत चालू ठेवणेबाबत मान्यता प्राप्त झाली. सदर सवलतीचा लाभ आकारणी दिनांक / दुरुस्ती दिनांकापासून घेणेकरिता मिळकत धारकाने PT – 3 अर्ज  15 नोव्हेंबर 2023 पर्यत व तदनंतर मिळकत धारकांच्या आग्रहास्तव PT-3 अर्ज भरणेकरिता  30 नोव्हेंबर 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच नवीन समाविष्ट 23 गावात PT-3 फॉर्म भरणेकरिता सुरुवातीस 31 जानेवारी 2024 पर्यत व तदनंतर 31 मार्च 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. उपरोक्त कालावधीमध्ये 4,63,989 मिळकतींपैकी 90,749 मिळकतधारकांनी PT-3 फॉर्म भरला असून 3,72,440 मिळकत धारकांनी PT-3 फॉर्म भरला नाही.
2024-25 या आर्थिक वर्षातील देयके वितरीत केल्यानंतर PT-3 फॉर्म भरण्याची मुदत वाढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी मागणी करीत होते. अशा 3,72,440 मिळकतींचा सर्व्हे पुणे महानगरपालिकेच्या सेवकांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचे काम मंगळवार  पासून चालू केले आहे.

– मिळकतकर विभागाने हे घेतले निर्णय

पुणे महानगरपालिकेच्या सेवकांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचे काम मंगळवार पासून चालू केले आहे.
मिळकतींचे सर्व्हेक्षण करतेवेळी मिळकत धारकांनी PT-3 अर्ज भरून देणे आवश्यक आहे. PT-3 अर्ज शुल्क 25 रु हे पुढील आर्थिक वर्षाच्या देयकामध्ये समाविष्ट करण्यात येईल.
40% सवलत न दिलेल्या मिळकतधारकांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
40% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक / दुरुस्ती दिनांकापासून घेणेकरिता मिळकत धारकांना PT-3 अर्ज भरण्याची मुदत  15 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याबाबत निर्णय घेणेत आला असून सदर सर्व्हेक्षणा मध्ये संबंधित मिळकतधारकांना PT-3 अर्ज देण्यात येणार असून त्याचवेळी आवश्यक कागदपत्रे संकलित करून सूट देणेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मिळकत धारकांने स्वतः राहत असल्याचे पुरावे ( गॅस कनेक्शन / आधार कार्ड / मतदान कार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / सोसायटी ना-हरकत प्रमाणपत्र ) पैकी कोणतेही 2 पुरावेसहित PT- 3 अर्ज संबंधित सर्व्हे करणाऱ्या सेवकांकडे किंवा पुणे महानगरपालिकेचे नागरी सुविधा केंद्रात जमा करावे.