PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागातील २३ समाविष्ट गावात काम करणाऱ्या ८७ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या!
| टैक्स वसुली वर दिला जाणार भर
Pune Property tax – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने (Pune Municipal Corporation Property Tax Department) आता टॅक्स वसुलीवर जोर दिला आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार समाविष्ट २३ गावातील ८७ कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी घेतला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
| वसुलीसाठी पथके तयार
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आता वसुलीची कामे देण्यात येणार आहेत. वसुलीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्या पथकात एक पेठ निरीक्षक (SI) आणि तीन ते चार कर्मचारी असतील. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अशी ४-५ पथके असतील. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
| टॉप १०० थकबाकी दारांची यादी तयार
आपापल्या परिसरातील टॉप १०० लोकांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी ही यादी तयार केली आहे. या थकबाकीदारांना पहिल्यांदा फ़ोन च्या माध्यमातून संपर्क केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष घरी जाऊन वसुली केली जाणार आहे. असे जगताप यांनी सांगितले.
| डिसेंबर अखेर पर्यंत २५० कोटी उत्पन्नाचे टार्गेट
जगताप यांनी सांगितले कि, एका विभागीय निरीक्षकाला (DI) महिन्याला १० कोटी वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. खात्यात असे एकूण २७ DI आहेत. त्यानुसार डिसेंबर अखेर पर्यंत २५०-२७० कोटी मिळवण्याचे उदिष्ट ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षात टॅक्स मधून ३ हजार कोटी उत्पन्न आम्ही मिळवू, असा विश्वास माधव जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
COMMENTS