PMC Property Tax Department | नागरिकांनो तुम्ही देखील करू शकता अनधिकृत प्रॉपर्टी ची पुणे मनपा कडे तक्रार

HomeBreaking Newsपुणे

PMC Property Tax Department | नागरिकांनो तुम्ही देखील करू शकता अनधिकृत प्रॉपर्टी ची पुणे मनपा कडे तक्रार

Ganesh Kumar Mule Jul 04, 2023 12:58 PM

Assistant Municipal Commissioner PMC Property Tax | प्रशासन अधिकारी सुनिल मते यांच्याकडे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार! 
Pune PMC Property Tax | प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट!
PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills | पुणे महापालिकेने WhatsApp Chatbot च्या माध्यमातून पाठवली 12 लाख मिळकतकर बिले

PMC Property Tax Department | नागरिकांनो तुम्ही देखील करू शकता अनधिकृत प्रॉपर्टी ची पुणे मनपा कडे तक्रार

| पुणे महापालिकेकडून वॉर रुम आणि व्हाट्स अप नंबर जारी

PMC Property Tax Department |  पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) शहरातील नागरीकाकरिता एक वॉररूम तयार करण्यात आली आहे. यामध्ये गृह निर्माण संकुलांमध्ये निवासी सदनिके व्यतिरिक्त कार्यालयीन वापर, व्यावसायिक वापर उदा ऑफिस, ब्युटीपार्लर, क्लिनिक अथवा निवासी मिळकतीमध्ये अनधिकृत हॉटेलचा (Illegal Hotel) वापर सुरु असल्यास अथवा एखा‌द्या मिळकतीची कर आकारणी केली नसल्यास, अशा मिळकतींची माहिती whats app no. 8308059999 या क्रमांकावर कळवावी. असे आवाहन पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून नागरिकांना (PMC Pune Property tax department) करण्यात आले आहे. (PMC Property Tax Department)
पुणे महानगरपालिका (PMC Pune) कार्यक्षेत्रात नव्याने अस्तित्वात येणाऱ्या निवासी, बिगर निवासी, मोकळ्या जागा इत्यादी मिळकती तसेच वापरात बदल होणाऱ्या मिळकतींची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार त्या-त्या वर्षाच्या प्रचलित दरसूची नुसार आकारणी करून संबंधित मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करण्यात येते. (PMC Pune News)
पुणे शहरामध्ये निवासी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरु आहेत. निवासी मिळकतीमध्ये बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता, वापरात बदल करून, अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट, बार, खानावळ इत्यादी व्यवसाय सुरु असून, रात्री उशिरा ते पहाटे पर्यंत सुरु असतात त्यामध्ये कर्णकर्कश आवाजात music system सुरु असल्याने, निवासी भागातील शांतता भंग होत आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्यामुळे पार्किंगचा तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे, याबाबत बातम्या येत आहेत. तसेच काही लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी देखील खात्याकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. (Pune Municipal Corporation News)
या  सर्व गोष्टी हॉटेल, पब, रेस्टॉरंटमध्ये अनधिकृतपणे सर्रास सुरु असल्याने या सर्व गोष्टीना चाप बसावा तसेच सदर निवासी मिळकती मध्ये बिगर निवारी व्यवसाय करून पुणे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कर आकारणी व कर संकलन कार्यालय, पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरीकाकरिता एक वॉररूम तयार करण्यात आली आहे. यामध्ये गृह निर्माण संकुलांमध्ये निवासी सदनिके व्यतिरिक्त कार्यालयीन वापर, व्यावसायिक वापर उदा ऑफिस, ब्युटीपार्लर, क्लिनिक अथवा निवासी मिळकतीमध्ये अनधिकृत हॉटेलचा वापर सुरु असल्यास अथवा एखा‌द्या मिळकतीची कर आकारणी केली नसल्यास, अशा मिळकतींची माहिती whats app no. 8308059999 या क्रमांकावर कळविणे बाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. (Pune Property Tax)
अशा मिळकतींचा पत्ता व location पुणे महानगरपालिकेच्या उपरोक्त whats app क्रमावर कळविल्यास, त्याची दखल कर आकारणी व कर संकलन विभागाकडून घेण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
—-

शहरातील नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात. अशा लोकांची संख्या 90% च्या आसपास आहे. मात्र काही प्रमाणात लोक कर चुकवेगिरी करतात. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. अशा लोकांवर आळा घालण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करतो कि अनधिकृत प्रॉपर्टी, प्रॉपर्टी च्या वापरात बदल  (निवासी मिळकतीत हॉटेल चा वापर) आढळल्यास आमच्याकडे तक्रार करा.

अजित देशमुख, उपायुक्त, कर संकलन व कर आकारणी विभाग.
—-
News Title | PMC Property Tax Department |  Citizens you can also complain about unauthorized property to Pune Municipal Corporation