PMC Property tax Abhay Yojana | अभय योजनेचे उरले अवघे ३ दिवस | सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन |आतापर्यंत मिळाले ५७४ कोटी 

Homeadministrative

PMC Property tax Abhay Yojana | अभय योजनेचे उरले अवघे ३ दिवस | सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन |आतापर्यंत मिळाले ५७४ कोटी 

Ganesh Kumar Mule Jan 12, 2026 10:01 PM

PMC Road Department | सायकल स्पर्धेत जसे रस्ते तयार केले, त्याच दर्जाचे रस्ते पुढील काळात करावेत | अतिरिक्त आयुक्तांचे पथ विभागाला आदेश  | शहर परिवर्तन समिती स्थापन करण्यात येणार 
Nagpur Winter Session | कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vishwa Marathi Sammelan 2025 | तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू

PMC Property tax Abhay Yojana | अभय योजनेचे उरले अवघे ३ दिवस | सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन |आतापर्यंत मिळाले ५७४ कोटी

| आर्थिक वर्षात जमा झाले २३५८  कोटी

 

PMC Property tax Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मिळकतकर थकबाकी असणा-या मिळकतदारांसाठी शास्ती / दंडाच्या रक्कमेवर ७५% सूट देणेकामी “अभय योजना”  १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ अखेर जाहिर करण्यात आली आहे. यातून पालिकेला ५७४ कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान या योजनेचे अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन मिळकत कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  (Pune PMC News)

 

पुणे महानगरपालिका हद्दीत निवासी, बिगरनिवासी व मोकळ्या जागांची वर्षानुवर्ष कर न भरल्याने थकबाकी असलेल्या मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच थकबाकी असलेल्या मिळकतींवर दरमहा आकारण्यात येणाऱ्या मिळकतींना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ४१ अन्वये २% शास्ती आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिळकतकराची थकबाकी निर्माण होत आहे.

अभय योजनेचा लाभ संबंधित मिळकतदारांना मिळून मिळकतकर जमा होण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त कर भरणा वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले होते.  परिणामी आज रोजी “अभय योजना” अंतर्गत एका दिवसात ४९.१५ कोटी रुपये इतका भरणा झाला असून आजअखेर एकूण २३५८.१०/- रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षी ३१ मार्च २०२५ अखेर २३४५.९० कोटी रुपये जमा झाले होते.  या वर्षी दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच योजना कालावधीत ५७४.७९ कोटी रुपये जमा झाले आहेत. अभय योजनेचे अजूनही ३ दिवस बाकी आहेत. सर्व थकबाकीदारांना आवाहन करणेत आले आहे की उर्वरित कालावधीत सर्व थकबाकी भरून थकबाकी रक्कमेवर आकारण्यात आलेल्या २% शास्ती रक्कमेवर देण्यात आलेला ७५% सवलतीचा लाभ घ्यावा. मिळकतदारांच्या सोयीसाठी नागरी सुविधा केंद्र सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. असे मिळकत कर विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: