PMC Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2090 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 314 कोटी ने अधिक उत्पन्न 

HomeBreaking Newsपुणे

PMC Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2090 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 314 कोटी ने अधिक उत्पन्न 

गणेश मुळे Mar 18, 2024 3:45 PM

2273 crore collected in the coffers of Pune Municipal Corporation from property tax
 How to Pay Pune Property tax Online | पुण्यात तुमचा मिळकत कर ऑनलाइन कसा भरावा? जाणून घ्या अधिकृत पोर्टल, पेमेंट करण्याची पद्धत आणि सर्व काही! 
 How to pay your property tax online in Pune?  Know PMC official portal, payment method and everything!

PMC Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2090 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 314 कोटी ने अधिक उत्पन्न

PMC Property Tax – (The Karbhari News Service) – 2024-25 या आर्थिक वर्षात 9 लाख 53 हजार 049 मिळकतधारकांनी रक्कम 20290 कोटी इतके जमा केलेले आहेत. ही रक्कम पूर्वीच्या म्हणजेच सन २०२३ २४ या वर्षाच्या जमेपेक्षा रक्कम 314 कोटी इतक्या रक्कमेने अधिक आहे. अशी माहिती महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या (Pune Municipal Corporation Property Tax Department) वतीने देण्यात आली. (Pune Property tax)

पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन केलेले आहे. त्यादृष्टीने २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले छपाई करून दिनांक 1 एप्रिल पासूनच पोस्ट विभागामार्फत वितरीत करण्यास येणार आहेत. तसेच अर्धवट पत्त्या अभावी परत येणारे मिळकतकराची बिले स्पीड पोस्ट द्वारे मिळकत धारकांना पाठवून मिळकतधारकांची नाव व पत्ता इ. माहिती अद्यावत करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

31 मे अखेर मिळकत करामध्ये ५% ते १०% इतकी सवलत मिळणार असल्यामुळे, मिळकतधारकांनी मिळकत कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन टॅक्स विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यासाठी CFC (नागरी सुविधा केंद्र) वर मिळकत कराची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी महानगरपालिका कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
तसेच  online payment करण्यासाठी खालील पर्याय / सुविधा उपलब्ध आहेत:-
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay, UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet
सन २०२३-२४ या वर्षामध्ये जानेवारी २०२४ पासूनच ५ झोन निहाय विशेष वसुली पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमध्ये ५ band पथकांचा समावेश करण्यात आलेला आहे. असे प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या वतीने सांगण्यात आले.