PMC Primary  Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेत 13-14 शिक्षक कमी | पालकांकडून आंदोलनाचा इशारा

HomeपुणेBreaking News

PMC Primary Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेत 13-14 शिक्षक कमी | पालकांकडून आंदोलनाचा इशारा

कारभारी वृत्तसेवा Oct 22, 2023 2:32 AM

Music School PMC : Deeapali Dhumal : संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा  : शिक्षण समिती समोर प्रस्ताव
Deepali Dhumal : समाविष्ट 23 गावातील कर्मचारी 4 महिन्यापासून वेतनाविना
Badlapur School Case | बदलापूर च्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना करा | दीपाली धुमाळ यांची मागणी

PMC Primary  Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेत 13-14 शिक्षक कमी | पालकांकडून आंदोलनाचा इशारा

PMC Primary Education Department | पुणे | वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची (PMC Primary Education Department) कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत 13-14 शिक्षकांची कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तरी या शाळेत अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

दीपाली धुमाळ यांच्या पत्रानुसार प्र.क्र. ३२ वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सदर शाळेत गेले अनेक दिवसांपासून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेत १३ ते १४ शिक्षक कमी आहे. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना
२ ते ३ वर्ग घ्यावे लागतात . त्याचप्रमाणे काही वर्गांना शाळेतील शिपाई तसेच बालवाडी शिक्षिका, मावशी व काही वेळेला पालक सुद्धा वर्गांना शिकवीत आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगला असुन या वर्षी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत १७ विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत. (PMC School)

 धुमाळ यांच्या पत्रात पुढे म्हटले आहे कि, शाळेची गुणवत्ता व दर्जा टिकवण्यासाठी कमी असलेले शिक्षकांची जागा भरणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षक कमी असल्याने पालकांमध्ये देखील असंतोष निर्माण होत आहे. वारंवार मागणी करूनही अद्यापही शिक्षकांची नेमणूक केली जात नाहीये. तरी येत्या गुरुवार २६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत या शाळेत शिक्षकांची नेमणूक न केल्यास शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपल्या महापलिकेच्या कार्यालय येथे येऊन आंदोलन करण्याची कठोर भूकिमा घेण्याचा इशारा दिला आहे. तरी लवकरात लवकर कै. शामराव श्रीपती बराटे या शाळेत कमी असलेल्या शिक्षकंची नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation school)
——-