PMC Pharmacist Recruitment Results | औषध निर्माता पदाचा अंतिम निकाल घोषित | निवड यादी महापालिका वेबसाईटवर प्रसिद्ध 

HomeपुणेBreaking News

PMC Pharmacist Recruitment Results | औषध निर्माता पदाचा अंतिम निकाल घोषित | निवड यादी महापालिका वेबसाईटवर प्रसिद्ध 

गणेश मुळे Feb 21, 2024 3:17 AM

PMC Pune Employees Union | पुणे मनपातील कर्मचारी संघटना ठराविक सेवकासाठीच काम करत असल्याचा आरोप  | महापालिका कर्मचारी दुसरा महासंघ स्थापण्याच्या तयारीत 
Dry Mist Based Fountain System | पुणे महापालिकेत नुकतीच उदघाटन केलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन सिस्टीम काय आहे?
Ramdas Athavale | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या दरबारात! | मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार! 

PMC Pharmacist Recruitment Results | औषध निर्माता पदाचा अंतिम निकाल घोषित | निवड यादी महापालिका वेबसाईटवर प्रसिद्ध

PMC Pharmacists Recruitment Results |  पुणे महापालिकेच्या वतीने औषध निर्माता पदासाठी भरती प्रक्रिया (PMC Drug Manufacturer Recruitment) राबवण्यात आली. एकूण 15 जागांसाठी ही भरती होती. त्याचा अंतिम निकाल (PMC Pharmacist Results) महापालिकेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना हंगामी नेमणुका देण्यात आल्या आहेत. उमेदवारांची यादी महापालिका वेबसाईटवर (PMC Website) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

: उमेदवारांची यादी येथे पहा : Pharmacist Results

महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली होती.  पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी  वाढवण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला होता. (PMC Pune Bharti 2023)

 

 एवढ्या कालावधीत महापालिकेकडे 10744 अर्ज आले होते. त्यातील 10171 अर्ज पात्र झाले होते. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. या भरती प्रक्रियेत फायरमन च्या सर्वात जास्त जागा होत्या. फायरमन च्या 200 जागां होत्या. त्याचा अंतिम निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून 167 उमेदवार पात्र करण्यात आले आहेत. औषध निर्माता पदासाठी 3148 अर्ज आले होते. त्यातील 3032 पात्र झाले होते. त्यांची परीक्षा घेण्यात आली होती. आता त्यांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.