PMC Pay and Parking Policy | पे अँड पार्क ची निविदा प्रक्रिया लागू | ८ दिवसांचा कालावधी | प्रायोगिक तत्त्वावर ५ रस्त्यांची निवड
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेने शहरातील वाहतूक कोंडी, अव्यवस्थित पार्किंग आणि रस्त्यांवरील अडथळे कमी करण्याच्या उद्देशाने व्यापक पार्किंग धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणाचा भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर ५ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे. त्यासाठी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अशी माहिती प्रकल्प विभागाकडून देण्यात आली. (PMC Project Department)
या धोरणाचा भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर शहरातील पाच प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवर पे अँड पार्क व्यवस्था राबविण्यात येत आहे. यामध्ये जे. एम. रोड, एफ. सी. रोड, लक्ष्मी रोड, विमान नगर रस्ता, बिबवेवाडी रस्ता, तसेच बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बाणेर म्हाळुंगे ते साई चौक अशा रस्त्यांचा समावेश आहे. ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणीऑफ-स्ट्रीट पार्किंग कभी दराने उपलब्ध होऊन अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यास तसेच रस्ता स्वच्छतेलाही मदत होणार आहे. ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी होईल या अनुषंगाने उपाययोजना सुरु केल्या अआहे. या योजनेसाठी आवश्यक त्या सर्व मान्यता मिळाली असून, आवश्यक विशेष अटी व शर्तींसह निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार, या उपक्रमामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी निश्चित, सुरक्षित आणि नियोजित पार्किंग उपलब्ध होणार आहे. यामुळे अनधिकृत पार्किंग कमी होईल, वाहतुकीची कोंडी घटेल आणि रस्त्यालगत असलेल्या इमारतींच्या प्रवेशद्वारांना अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. असे प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.
निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार पे अँड पार्क’ करिता निश्चित करण्यात आलेले दर शुल्क (दुचाकी-४रु व चारचाकी २० रु प्रति तास) हे प्रकल्प विभागाकडील मक्ता पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या वाहन तळाच्या दर (दुचाकी- ३रुव चारचाकी १४ रु प्रति तास ) या पेक्षा जास्त असल्याने नागरिक हे बांधीव / बंदिस्त इमारतीतील वाहन तळाचा जास्त वापर करतील या उद्देशाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. वाहनचालकांना पार्किंग करिता अधिक सोयीस्कर विकल्प वापरण्यास प्रोत्साहित करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. तसेच वरील नमूद दरांच्या या तुलनेत असलेल्या फरकामुळे मुख्य रस्त्यांवरील पार्किंग कमी होईल आणि carriage way अधिक मोकळा राहील, ज्यामुळे वाहतुकीचा वेग सुधारेल आणि अनधिकृत वाहनतळ आणि अज्ञात वाहनांचे पार्किंगवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. असे प्रशासनाने म्हटले आहे.
‘पे अँड पार्क’ या धोरणामुळे रस्त्यावरील अनियमितरीत्या पार्क केलेल्या वाहनांमुळे रस्ते स्वच्छता यंत्रणेला निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होऊन रस्ते स्वच्छता आणि आरोग्यविषयक स्थितीत सुधारणा होणार आहे. स्वच्छ रस्ते आणि नियमित साफसफाईमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणामही कमी होतील.
पुणे महानगरपालिकेचा हा उपक्रम शहरातील पार्किंग व्यवस्थेला शिस्त देण्याबरोबरच वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयींमध्ये सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे. असे प्रकल्प विभागाने म्हटले आहे.
———-
५ रस्त्यावरील दुचाकी व चार चाकी वाहनांची संख्या
जेएम रोड | दुचाकी- ८५६ – चार चाकी – ५१
एफ सी रोड | दुचाकी – ८०४ – चार चाकी – १०८
लक्ष्मी रस्ता | दुचाकी – २३८६ – चार चाकी – ०
विमान नगर रस्ता | दुचाकी – ४९० – चार चाकी – १८५
बिबवेवाडी रस्ता | दुचाकी – ९२० – चार चाकी – ७५
बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर म्हाळुंगे ते साई चौक, बालेवाडी हाय स्ट्रीट ते नंदन प्रोस्पेरा गोल्ड सोसायटी | दुचाकी – ८८८ – चार चाकी – १९९

COMMENTS