PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त
PMC Officers Retirement | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) तीन दशक काम करणारे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (PMC Chief Engineer V G Kulkarni) , मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) हे महापालिका सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. महापालिकेत नम्रता पूर्वक काम कसे करावे, याचा आदर्श या दोघांनी घालून दिला आहे. त्यांच्या कामाची नोंद महापालिकेच्या इतिहासात नेहमी घेतली जाईल. (PMC Pune)
व्हि. जी. कुलकर्णी हे 1994 मध्ये महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. महापालिकेच्या 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी पाणी पुरवठा विभागात सर्वाधिक काळ अर्थात जवळपास 26 वर्षे काम पाहिले आहे. या कालावधीत खडकवासला ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्र बंद पाईप योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, चोवीस तास पाणी पुरवठा योजनांसह वारजे, वडगाव पाणी पुरवठा केंद्र तसेच काही एसटीपी प्लांटच्या निर्मिती मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांच्याकडे पथ विभागाचा कार्यभार होता. शिपाई ते वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांमध्ये ते एक नम्र अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. (Pune PMC News)
अरुण खिलारी यांनी कामगार अधिकारी म्हणून खूप काळ काम पाहिले. त्यांच्याकडे या कामासोबतच क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 10 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहिले. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. खिलारी हे महापालिकेत 1987 साली रेडिओग्राफर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी food inspector म्हणून 5 वर्ष काम पाहिले. कामगार कल्याण विभागात ते 2003 साली रुजू झाले. 2 वर्ष त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात देखील काम पाहिले. प्रत्येक काम तंतोतंत आणि चोख करण्यावर त्यांचा भर होता.
—