PMC Officers Property Declaration | मालमत्ता विवरणपत्र देण्यास क्लास वन अधिकाऱ्यांची उदासीनता | अतिरिक्त आयुक्तांकडून शिस्तभंग कारवाईचा इशारा

HomeपुणेBreaking News

PMC Officers Property Declaration | मालमत्ता विवरणपत्र देण्यास क्लास वन अधिकाऱ्यांची उदासीनता | अतिरिक्त आयुक्तांकडून शिस्तभंग कारवाईचा इशारा

गणेश मुळे Feb 19, 2024 3:31 AM

Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक
Balasaheb Thackeray Aapala Davakhana | राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
Kasba Peth by-election | कसबा पेठ पोटनिवडणुक | कॉंग्रेसच्या १६ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

PMC Officers Property Declaration | मालमत्ता विवरणपत्र देण्यास क्लास वन अधिकाऱ्यांची उदासीनता | अतिरिक्त आयुक्तांकडून शिस्तभंग कारवाईचा इशारा

PMC Officers Property Declaration | महापालिका कायद्यानुसार महापालिकेच्या वर्ग १ ते ३ ऱ्या गटातील सर्व अधिकाऱ्यांना (PMC Officers) त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  वर्ग 2 आणि 3 मधील कर्मचाऱ्यांनी ही माहिती सादर केली आहे. मात्र वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांनी अजूनही माहिती सादर केली नाही. त्यामुळे तात्काळ माहिती सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत. तसे न झाल्यास शिस्तभंग कारवाईचा इशारा देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

 – महापालिका कायद्यानुसार तपशील देणे बंधनकारक आहे

 महानगरपालिकेच्या इमारतीत आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 20 हजारांहून अधिक कामगार काम करतात.  श्रेणी 1 ते श्रेणी 4 कर्मचारी यामध्ये काम करतात.  राज्य सरकारच्या सूचनेनुसार श्रेणी 4 वगळता सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.  त्याअंतर्गत महापालिका त्यावर अमल करत आहे.  या तपशिलाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत.  तरीही त्यांच्या मालमत्तेचा तपशील महापालिका कर्मचारी व अधिकारी मांडत नाहीत. दरम्यान वर्ग तीन आणि 2 मधील कर्मचाऱ्यांनी ही माहिती सादर केली आहे. मात्र वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांनी अजूनही माहिती सादर केली नाही. वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे माहिती सादर करणे आवश्यक आहे. मात्र ही माहिती अधिकारी ज्या कार्यालयात काम करतात तेथेच पडून आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी शिस्तभंग कारवाईचा इशारा दिला आहे. (Pune PMC News)
अतिरिक्त आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे कि वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांनी त्यांची विवरणपत्रे खातेप्रमुख आणि अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून आयुक्तांकडे सादर करावीत. तर वर्ग 2 आणि 3 मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या खाते प्रमुखाकडे विवरणपत्र सादर करावीत.