PMC Municipal Secretary Department | महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडे जवळपास ४० वर्ष काम करणारे कड, बहिरट सेवानिवृत्त!
PMC Employees Retirement – (The Karbhari News Service) – नगरसचिव कार्यालयाकडील महेश कड आणि राजु बहिरट हे दोन सेवा जेष्ठ सेवक आज 31 जुलै 25 रोजी सेवा निवृत्त झाले. महेश कड यांनी ४० वर्षे ७ महिने महापालिकेत काम केले. तर बहिरट यांनी ३८ वर्षे नगरसचिव विभागात काम केले. (PMC Retirement)
त्यानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांचा सत्कार उप आयुक्त अविनाश सपकाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी विष्णू कदम, रुपेश सोनावणे ( अध्यक्ष ) पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना तसेच निलेश वडके, दिलीप चोपडे, उज्ज्वला ठाणगे व विविध पदाधिकारी होते

नगरसचिव कार्यालयाकडील ज्येष्ठ समिती लेखनिक महेश कड हे आज गुरुवार 31 जुलै 2025 रोजी 40 वर्षाची अविरत सेवा करून वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. सन 1985 पासून त्यांनी नगरसचिव कार्यालयात लिपिक टंकलेखक, समिती लेखनिक व ज्येष्ठ समिती लेखनिक अशा विविध पदांवर काम केले असून मुख्य सभा, महिला बालकल्याण सभा, शहर सुधारणा समिती, विधी समिती अशा विविध समित्यांवर यशस्वीरित्या काम केलेले आहे.
नगरसचिव कार्यालयाकडील ज्येष्ठ लेखनिक राजू बहिरट हे आज गुरुवार दि. 31 जुलै 2025 रोजी 38 वर्षाची अविरत सेवा करून वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. सन 1987 पासून त्यांनी नगरसचिव कार्यालयात विविध पदांवर काम केले असून टंकलेखन विभाग तसेच समिती अध्यक्ष यांचे कार्यालयात व गेले 3 वर्षे 3 महिने हडपसर क्षेत्रीय कार्यालय कार्यालयात परवाना व आकाश चिन्ह विभागात यशस्वीरित्या काम केले आहे.

COMMENTS