PMC Medical Officer Transfer | आरोग्य प्रमुखांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणारे अधिकारी एकाच ठिकाणी खूप काळ कार्यरत आहेत. अशा तक्रारी नागरिक तसेच विविध संस्थाकडून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य प्रमुख डॉ निना बोराडे (Dr Nina Borade PMC) यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नुकतेच या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (PMC Health Department)
आरोग्य प्रमुखांच्या आदेशानुसार बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात काम पाहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रेमलता घाटे यांचे बदली औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे.
औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालया कडील डॉ गणेश डमाळे यांची बदली वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडील डॉ अंजली टिळेकर यांची बदली कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे.
घोले रोड शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालया कडील डॉ मृणालिनी कोलते यांची बदली बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया कडील डॉ अरुणा तारडे यांची बदली सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे.
कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या डॉ गोपाळ उजवणकर यांची बदली घोले रोड शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे.
तर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या डॉ आसाराम काकडे यांची बदली कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे.

COMMENTS