PMC Labour Welfare Department | राज्य माहिती आयोगाकडून पुणे महापालिकेचे कौतुक | राज्यातील सर्व महापालिकांना पुणे मनपा प्रमाणे काम करण्याचे आदेश

Homeadministrative

PMC Labour Welfare Department | राज्य माहिती आयोगाकडून पुणे महापालिकेचे कौतुक | राज्यातील सर्व महापालिकांना पुणे मनपा प्रमाणे काम करण्याचे आदेश

Ganesh Kumar Mule Sep 09, 2024 1:58 PM

PMC Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना! | आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना फायदा 
PMC Retired Employees | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना ABCDE शंभर वर्ष जगण्याचा मंत्र | व्याख्याते श्याम भुर्के यांचे मार्गदर्शन
Pune PMC News | आपले विचार हीच आपली शक्ती : डॉ राजेंद्र भारूड | महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मान!

PMC Labour Welfare Department | राज्य माहिती आयोगाकडून पुणे महापालिकेचे कौतुक | राज्यातील सर्व महापालिकांना पुणे मनपा प्रमाणे काम करण्याचे आदेश

 

PMC Labour Welfare Department – (The Karbhari News Service) – राज्य माहिती आयोगाकडून (State Information Commission of Maharashtra) पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation-PMC) कौतुक करण्यात आले आहे. शिवाय राज्यातील सर्व महापालिकांना पुणे मनपा प्रमाणे काम करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाला माहिती अधिकाराचं काम करण्याबाबत हुरूप आला आहे. (Pune PMC News)

– कोरोना काळातील प्रलंबित प्रकरणे

माहिती आयोगाने पुणे महापालिका सहित राज्यातील सर्व महापालिकाकडून माहिती अधिकाराच्या द्वितीय अपिलांचा अनुपालन अहवाल मागितला होता. २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालखंडातील ही प्रलंबित प्रकरणे होती. हा कोरोनाचा कालखंड होता. प्रकरणे प्रलंबित राहिल्याने आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयोगाने अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

– द्वितीय अपील म्हणजे काय?

अर्जदार माहिती अधिकारात माहिती मागवतात. प्रशासनाकडून ही माहिती दिली जाते. मात्र या माहितीवर अर्जदाराचे समाधान होत नाही. त्यामुळे अर्जदार अपिलात जातात. यास द्वितीय अपील असे म्हटले जाते.

– कामगार कल्याण विभागाचे चोख काम

दरम्यान महापालिका आयुक्तांनी माहिती अधिकार कामाबाबत नोडल अधिकारी बदलला आहे. पूर्वी हे काम सामान्य प्रशासन विभागाकडे होते. आता हे काम कामगार कल्याण विभागाकडे देण्यात आले आहे. याचे नोडल अधिकारी हे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे हे आहेत.

याबाबत केंजळे यांनी सांगितले कि, नोडल अधिकारी पदाची जबाबदारी घेतल्यावर राज्य सरकारचे अनुपालन अहवाल पाठवण्याचे आदेश आले होते. त्यानुसार आम्ही द्वितीय अपिलांची तपासणी केली. अशी एकूण ३६० प्रकरणे होती. यातील प्रत्येक प्रकरण तपासून आम्ही त्याचा अहवाल आयोगाकडे पाठवला. इतर कुठल्याही महापालिकेच्या आधी आम्ही हे काम केले. शिवाय आयोगाच्या फॉर्मेट नुसार आम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अहवाल पाठवला. महापालिकेचे काम आवडल्याने आयोगाने पुणे महापालिकेचे कौतुक केले. शिवाय सर्व महापालिकांना पुणे मनपा प्रमाणे काम करण्याचे आदेश दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0