PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा
| महापालिका प्रशासनाकडून कारवाई
PMC Retirement – (The Karbhari News Service) – महापालिका अधिकारी आणि कर्मचारी हे सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन सुरू करण्यात उदासीन असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आता महापालिका प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले आहे. ५ पेक्षा अधिक पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या बिल क्लार्क यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणा केल्याबद्दल खुलासा द्यावा लागणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. याचा फटका सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना सहन करावा लागतो. कारण निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वेतन बंद होते. त्यांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी पेन्शनची आवश्यकता असते. मात्र काही कर्मचारी आणि अधिकारी या कामात हलगर्जीपणा करतात, याचा परिणाम सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना भोगावा लागतो. यामुळे ही बाब महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी गंभीरपणे घेतली आहे. ५ पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचा रीतसर खुलासा करावा लागणार आहे. अन्यथा महापालिका अधिनियम नुसार कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
—-
सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांचे वेतन निवृत झाल्यानंतर बंद होते. त्यामुळे त्यांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी पेन्शन तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना करूनही काही अधिकारी/कर्मचारी सेवकांची पेन्शन सुरू करण्यात उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई झाल्यास पेन्शन प्रकरणे तात्काळ मार्गी लागण्यास मदत होईल. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे.
– नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी.
COMMENTS