PMC Junior Engineer Recruitment 2025 | आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ४४१९ उमेदवारांनी घेतला लाभ | भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात!

Homeadministrative

PMC Junior Engineer Recruitment 2025 | आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ४४१९ उमेदवारांनी घेतला लाभ | भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात!

Ganesh Kumar Mule Sep 18, 2025 8:11 PM

Pune Municipal Corporation Bharti 2025 | पुणे महापालिकेत लवकरच सरळसेवा भरती!
PMC GAD | महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रच सादर केले नाही | कारवाई करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा इशारा
PMC General Administration Department | समाविष्ट २३ गावातील ४०८ कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन योग्य आहे का? महापालिका करणार तपासणी!

PMC Junior Engineer Recruitment 2025 | आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ४४१९ उमेदवारांनी घेतला लाभ | भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात!

 

 

PMC Junior Engineer Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिके कडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ मधील रिक्त पदे सरळसेवेने भरणेसाठी नवीन जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान  सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीसाठी १२ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. याचा ४४१९ उमेदवारांनी लाभ घेतला आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC General Administration Department)

एकूण १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण होत आली आहे. दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, अशा २७८७९ उमेदवारांपैकी वय मर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कारण या सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय या सर्व उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची देखील संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

दरम्यान सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीबाबत  प्रशासनाला अपेक्षित होते कि एकूण १६ हजार ६२७ पैकी किमान ५ हजार उमेदवार याचा लाभ घेतील. मात्र कमी उमेदवार आल्याने ही मुदत वाढवण्यात आली होती. त्यानुसार सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ४४१९ उमेदवारांनी लॉग इन करून लाभ घेतला आहे. ही मुदत ३० ऑगस्ट पर्यंत होती. मुदत वाढवून १२ सप्टेंबर करण्यात आली होती.

दरम्यान आता भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कारण प्रशासनाची सगळी तयारी असली तरी परीक्षा घेणारी संस्था म्हणजे IBPS च्या काही तांत्रिक बाबी राहिल्या आहेत, त्यामुळे जाहिरात येण्यास वेळ लागत आहे. मात्र आता पुढील आठवड्यात जाहिरात येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0