International Heart Day 2025 | जागतिक हृदय दिनानिमित्त महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सीपीआर (CPR) प्रशिक्षण!
PMC Health Department – (The Karbhari News Service) – २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी (PMC Employees and Officers) यांचेकरिता सीपीआर प्रशिक्षण (Cardiopulmonary resuscitation (CPR)आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय समन्वयक रिव्हीव्ह हार्ट फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे,लक्ष्मी रोड यांच्या वतीने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
या प्रशिक्षणाचे नेतृत्व प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ करणार असून ते अनेक वर्षांपासून या उपक्रमाशी संबंधित आहे.
२९ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी.हॉल, तिसरा मजला पुणे मनपा मुख्य इमारत) येथे पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता सीपीआर प्रशिक्षण आयोजित करणेत आलेले आहे. या प्रशिक्षणाकरिता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी दु.३:३० वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी. बी. हॉल तिसरा मजला, पुणे मनपा, मुख्य इमारत) येथे उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS