PMC Joint Municipal Commissioner | मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांना सह महापालिका आयुक्त असे नामभिधान देण्यास मंजुरी
| खातेप्रमुख संवर्गात दहा वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या खातेप्रमुखांचे नामभिधान ‘सह महापालिका आयुक्त (जॉइंट म्युनिसिपल कमिशनर)’ करण्यास मान्यता
Pune PMC News – (The Kabhari News Service) – पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील खातेप्रमुख संवर्गातील जागेवर नियुक्त अधिकाऱ्यांची सलग वर्षे सेवा किंवा जास्त कालावधीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढतीची संधी नाही म्हणून त्यांचे पदाचे नामभिधान बदलून ते सह महापालिका आयुक्त (जॉईट म्युनिसिपल कमिशनर) करण्याचे धोरण मान्य करण्यात आले आहे. मात्र ज्या अधिकाऱ्यांचा हुद्दा अधिनियमात हुद्दा नमूद केल्यामुळे तो हुद्दा बदलता येणार नाही, त्यांना ‘सह महापालिका आयुक्त’ समकक्ष समजण्यात यावे. व त्यांना ‘सह महापालिका आयुक्त’ यांना देण्यात येणारे सर्व फायदे देण्यात यावे. त्यानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे मुख्य उद्यान अधिक्षक या संवर्गात सलग दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेले अधिकारी अशोक दिगंबर घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांचे सध्याचे पदास सह महापालिका आयुक्त (मुख्य उद्यान अधिक्षक) म्हणून २२/०४/२०२५ (आज्ञापत्राचे दिनांकापासून) पासून संबोधण्यात मान्यता देण्यात आली आहे. नुकतीच या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
घोरपडे यांना त्यांचे महिने महाचे वेतनाबरोबर २३०० विशेष वेतन दरमहा आज्ञापत्राचे दिनांकापासून लागू करण्यात आले आहे. तसेच उपरोक्त अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या पदास जे अधिकार सुपूर्त केले आहे ते सह महापालिका आयुक्त (मुख्य उद्यान अधिक्षक) या पदावर कार्यरत असणारे अशोक दिगंबर घोरपडे या अधिकाऱ्यास प्राप्त असतील.
सह महापालिका आयुक्त (जॉईट म्युनिसिपल कमिशनर) ही पद निर्मिती नसून, खातेप्रमुख संवर्गात १० वर्षे किंवा जास्त कालावधीसाठी सलग सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांस संबोधावयाचे नामभिधान आहे. तरी, पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील खातेप्रमुख या संवर्गात १० वर्षे पेक्षा जास्त सलग सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या नामभिदान बदलास विधी समितीमार्फत महानगरपालिका मुख्य सभेची पश्चात मान्यता घेण्यात यावी. असे प्रस्तावात म्हटले आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील खातेप्रमुख संवर्गातील जागेवर नियुक्त अधिकाऱ्यांची सलग दहा वर्षे सेवा किंवा जास्त कालावधीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढतीची संधी नाही, म्हणून त्यांचे नामाभिधान बदलून ते सह महापालिका आयुक्त केले जाईल. मात्र ज्या अधिकाऱ्यांचा हुद्द अधिनियमात नमूद नसल्याने हा हुद्दा बदलला जाणार त्यांना सह महापालिका आयुक्त समकक्ष समजले जाईल. तसेच त्यांना सर्व फायदे देखील दिले जाणार आहेत. मात्र यासाठी विधी समितीमार्फत महानगरपालिका मुख्य सभेची पश्चात मान्यता घ्यावी लागणार आहे.

COMMENTS