PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) पदासाठी आजपासून अर्ज भरता येणार | अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, वेतनश्रेणी, जाणून घ्या 

HomeBreaking Newsपुणे

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) पदासाठी आजपासून अर्ज भरता येणार | अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, वेतनश्रेणी, जाणून घ्या 

गणेश मुळे Jan 16, 2024 6:30 AM

Pune News | रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन
PM SVAnidhi Scheme | PMC Pune | पुणे महापालिकेकडून PM SVAnidhi चे 53% काम पूर्ण! 
PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) पदासाठी आजपासून अर्ज भरता येणार | अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, वेतनश्रेणी, जाणून घ्या

PMC Junior Engineer Recruitment 2024  | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तिसऱ्या टप्प्यातील भरती (PMC Recruitment 2024) प्रक्रिया सुरु केली आहे. आता 113 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. आता महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाकडून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाईट वर 16 जानेवारी म्हणजेच पासून उपलब्ध झाल्या आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी ते परीक्षेचे स्वरूप अशी सर्व माहिती आपण जाणून घेऊया. (Pune Mahanagarpalika Bharti 2024)
JE ची अनुभवाची अट कमी झाल्याने नवीन उमेदवारांना संधी
दरम्यान कनिष्ठ अभियंता (JE) साठी 3 वर्षाची अनुभवाची अट ठेवण्यात आली होती. मात्र याबाबत बऱ्याच दिवसापासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा  प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजूरी दिली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. तर अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली आहे. याचा नुकतीच पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना फायदा होणार आहे. (PMC JE Recruitment 2024)
एकूण पदे : 113 (स्थापत्य अभियंता) 
: पात्र उमेदवाराकडून PMC Website | www.pmc.gov.in या संकेतस्थळावर Recruitment या Tab मध्ये ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्याचा आणि  शुल्क भरण्याचा कालावधी : 16 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2024 
: समांतर आरक्षण असे असेल 
1. इतर (समांतर आरक्षणा व्यतिरिक्त) : 36 पदे
2. महिला आरक्षण (30%) : 32 पदे
3. माजी सैनिक (15%) : 26 पदे
4. अंशकालीन (10%) : 8 पदे
5. खेळाडू (5%) : 5 पदे
6. प्रकल्पग्रस्त  (5%) : 5 पदे
7. भूकंपग्रस्त (2%) : 1 पद
8. दिव्यांग (4%) : 5 पदे
9. अनाथ (1%) : 1 पद
महत्वाचे : दरम्यान दिव्यांग आणि अनाथ ची 6 पदे ही जशी उपलब्ध होतील तशी आणि त्या त्या कॅटेगरी मध्ये भरली जातील. ही पदे 113 पद मधीलच असतील. ती 113+6 अशी नसणार आहेत.
: वेतनश्रेणी : S 14 : 38,600 ते 1 लाख 22 हजार 800
—-
: वयोमर्यादा : 
खुल्या प्रवर्गातील उमेदवार : 38 वर्ष
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार  : 43 वर्ष
दिव्यांग उमेदवार   : 45 वर्ष
दिव्यांग माजी सैनिक  : 45 वर्ष
पुणे महापालिकेच्या स्थायी कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा नाही. तसेच अनुभवाची गरज असल्यास 5 वर्षाची अट शिथिल असेल.
स्वातंत्र्य सैनिक पाल्य : 45 वर्ष
अंशकालीन उमेदवार  : 55 वर्ष
परीक्षा शुल्क 
 
– खुला प्रवर्ग : 1000/- 
– मागासवर्गीय प्रवर्ग : 900/- 
– माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक :शुल्क माफ असणार 
—–
 
: परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम कसा असेल? 
– ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार 
– एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक 
– मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही
 
– 200 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. त्याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. 
– प्रत्येक प्रश्नांस 2 गुण असतील 
 
– 60 प्रश्न हे 12 वी परीक्षा समान असतील. यामध्ये मराठी विषयाशी संबंधित 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न तर बौद्धिक चाचणी बाबत 15 प्रश्न असतील. याचे माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे. 
 
–  40 प्रश्न हे पदवी/पदविका परीक्षेच्या समान असतील. याचे माध्यम हे इंग्रजी असणार आहे. 
—-