PMC Holidays | वर्ष २०२५ साठी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर
New Year 2025 – (The Karbhari News Service) – चालू वर्ष म्हणजेच २०२५ साल (New year २०२५) सुरू झाले आहे. महापालिका प्रशासनाकडून (Pune municipal corporation) दर वर्षी सुट्ट्या (holiday) जाहीर करण्यात येतात. त्यानुसार महापालिका कमर्चारी आणि अधिकाऱ्यासाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण १९ सुट्ट्या असणार आहेत. तर ६ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. तसेच पालखी आगमन ची अर्ध्या दिवसाची सुट्टी असणार आहे. (PMC Pune)
महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional commissioner) कार्यालयाकडून या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध उत्सव, सण (festival) यासाठी सुट्ट्या देण्यात येत असतात. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, दिवाळी असे सगळे सणवार धरून वर्षभरात एकूण १९ सुट्ट्या महापालिका कर्मचाऱ्यांना मिळतील. तर ६ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन – रविवार, मनपा वर्धापन दिन – शनिवार, गुढी पाडवा – रविवार, रामनवमी – रविवार, बकरी ईद -शनिवार, मोहरम – रविवार यांचा समावेश आहे. तर २० जून या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. त्यादिवशी अर्धा दिवस सुट्टी राहिल. (Pune Municipal Corporation)
—
COMMENTS