PMC Health Officer | डॉ निना बोराडे यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी नियुक्ती | २ वर्षासाठी असणार नियुक्ती

HomeपुणेBreaking News

PMC Health Officer | डॉ निना बोराडे यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी नियुक्ती | २ वर्षासाठी असणार नियुक्ती

गणेश मुळे Jul 25, 2024 10:33 AM

Guillain Barre Syndrome In Pune | GBS चे पुण्यात २४ रुग्ण! | ८ रुग्ण अतिदक्षता विभागात
PMC Health Department | तर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली जाणार कारवाई | आरोग्य प्रमुखांचा इशारा
PMC CHS | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | CHS योजनेबाबत महापालिका कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा! 

PMC Health Officer | डॉ निना बोराडे यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी नियुक्ती | २ वर्षासाठी असणार नियुक्ती

| राज्य सरकार कडून आदेश जारी

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) डॉ निना बोराडे (Dr Nina Borade) यांच्या रुपाने आरोग्य अधिकारी मिळाला आहे. राज्य सरकार कडून नुकतेच बोराडे यांच्या २ वर्षाच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ बोराडे या नांदेड येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. (Pune Municipal Corporation Health Department)
पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांचे राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार हा उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान आता महापालिकेला पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी मिळाला आहे.

| सरकारने ठेवल्या अटी

डॉ. निना मधुकर बोराडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, नांदेड, यांची आरोग्य अधिकारी (आरोग्य प्रमुख) पुणे महानगरपालिका या रिक्त पदावर २ वर्षांसाठी खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे:-

अ) जर पुणे महानगरपालिकेस नामनिर्देशाने अथवा पदोन्नतीने आरोग्य अधिकारी (आरोग्य प्रमुख) उपलब्ध झाला तर त्यांच्या सेवा मूळ विभागास परत करण्यात येतील.

आ) जर त्यांची सेवा लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने शासनास आवश्यक वाटली तर, प्रतिनियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांना परत बोलावून घेण्याचा अधिकार शासन राखून ठेवत आहे.
इ) जर त्यांची सेवा स्वीयेतर नियोक्त्याला आवश्यक वाटली नाही तर त्यांच्या सेवा परत करण्याची मुभा स्वीयेतर नियोक्त्याला राहील.
ई) त्यांनी मूळ विभागाकडे परत जाण्याचा आपला उद्देश आहे अशी कमीत कमी तीन महिन्यांची लेखी नोटीस दिल्यानंतर त्यांना मुळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहील.