PMC Health Department | कीटकजन्य आजारांबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती 

HomeBreaking Newsपुणे

PMC Health Department | कीटकजन्य आजारांबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती 

Ganesh Kumar Mule Jul 08, 2023 11:08 AM

PMC CHS Scheme | 2005 नंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना  सेवानिवृत्तीनंतर अंशदायी वैदयकीय योजनेचा (CHS) लाभ द्या | पीएमसी एप्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी
 Pune Municipal Corporation (PMC) News | आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विविध पदावरील अधिकारी आणि सेवकांची प्रारूप सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द 
PMC Employees Union | CHS योजनेबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या महापालिका आयुक्तांकडे विविध मागण्या! 

PMC Health Department | कीटकजन्य आजारांबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती

PMC Health Department |  पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) कीटक प्रतिबंधक विभागाकडून शहरात ठिकठिकाणी कीटकजन्य आजारांबाबत (Insect Borne Diseases) जनजागृती करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर (PMC Ward Offices) हे काम केले जात असून नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे, यासाठी हे काम केले जात आहे. अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Assistant Health Officer Dr Suryakant Devkar) यांनी दिली. (PMC Health Department)
पावसाळ्याच्या दिवसांत शहरात कीटकजन्य आजार डोके वर काढतात.  यामध्ये  डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुनिया या कीटकजन्य आजाराचा समावेश असतो. मागील काही वर्षांपासून डेंगू शहरात थैमान घालत आहे. यावर्षी अजून जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी शहरात कीटकजन्य आजार दिसून येत नाहीत. यामुळे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडून आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती अभियानांतर्गत पत्रके वाटण्यात येत आहेत. ठिकठिकाणी स्टिकर्स चिकटवण्यात येत आहेत.  तसेच बॅनर्स लावण्यात आले आहेत. शहरातील शाळा, सोसायट्या तसेच सर्वच सार्वजनिक ठिकाणी असे बॅनर्स लावण्यात येत आहेत. असे डॉ देवकर यांनी सांगितले. (Pune Insect Borne Diseases)
News Title | Public awareness by Health Department of Pune Municipal Corporation regarding insect borne diseases