PMC Health Department | पुणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी उद्या कॅन्सर प्रतिबंधक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!

PMC Building

HomeBreaking News

PMC Health Department | पुणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी उद्या कॅन्सर प्रतिबंधक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!

Ganesh Kumar Mule Aug 19, 2024 5:53 PM

PMC Pune Health Scheme | पुणे महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेबाबत आरोग्य विभागाचे नवीन आदेश 
Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका
PMC Health Department | उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्या कामाची जबाबदारी वाढवली 

PMC Health Department | पुणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी उद्या कॅन्सर प्रतिबंधक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!

 

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका भवन (PMC Building) येथील महिला कर्मचारी वर्गाची (PMC Women Employees) गर्भपिशवी तोंडाच्या कॅन्सरच्या (Cancer of the Uterus) प्रतिबंधासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर (Health Camp) आयोजित करण्यात आले आहे. उद्या सकाळी १०:३० पासून ४ वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. याचा महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपआरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Dr Kalpana Baliwant PMC) यांनी केले आहे. (Pune PMC News)

प्रयास (आरोग्य, उर्जा, शिक्षण आणि पालकत्व या विषयांतील विशेष प्रयत्न) सेवाभावी संस्था, पुणे २०१० पासून गर्भपिशवी तोंडाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी कार्यरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत गर्भपिशवी तोंडाच्या कॅन्सरचे जगभरातून निर्मुलन करण्याचे आवाहन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका कार्यालय (PMC Building) येथील महिला कर्मचारी वर्गाची गर्भपिशवी तोंडाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठी मोफत तपासणी शिबीर आरोग्य कार्यालयाकडून आयोजित करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation- PMC)

तरी हे गर्भपिशवी तोंडाच्या कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत तपासणी शिबिरासाठी पुणे महानगरपालिका भवन, मुख्य इमारत, शिवाजीनगर येथील सर्व विभागाकडील कार्यरत महिला कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले अहेर

• तपासणी शिबिर – २० ऑगस्ट २०२४

• तपासणीची वेळ – सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत

तपासणीचे स्थळ – महिलांचे विश्रांतीगृह, पहिला मजला नवीन बिल्डिंग, पुणे महानगरपालिका (PMC New Building)

तपासणी कोणासाठी? – ३० ते ६० या वयोगटातील सर्व महिलांसाठी सर्व महिला कर्मचारी, पुरुष
कर्मचारी यांची पत्नी, (तुम्ही तुमच्या मैत्रिणी, महिला नातेवाईक, तुमच्याकडे कामासाठी येणाऱ्या महिला)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0