PMC Health Department on Deposit | अनामत रकमेवरून पुणे महापालिका आरोग्य विभागाची शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स, रुग्णालये आणि नर्सिंग होम्स ना नोटीस!

Homeadministrative

PMC Health Department on Deposit | अनामत रकमेवरून पुणे महापालिका आरोग्य विभागाची शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स, रुग्णालये आणि नर्सिंग होम्स ना नोटीस!

Ganesh Kumar Mule Apr 08, 2025 8:13 PM

Deenanath Mangeshkar Hospital Pune | पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल
Deenanath Mangeshkar Hospital | महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास दिलेल्या सर्व  सवलती रद्द करण्याची मागणी 
Dr Dhananjay Kelkar | वैद्यकीय आयोगाने डॉ. केळकर यांची मान्यता रद्द करावी – अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कार्यकर्ते विशाल विमल यांची मागणी

PMC Health Department on Deposit | अनामत रकमेवरून पुणे महापालिका आरोग्य विभागाची शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स, रुग्णालये आणि नर्सिंग होम्स ना नोटीस!

 

Pune Municipal Corporation Health Department – (The Karbhari News Service) – शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील (Deenanath Mangeshkar Hospital) घटनेवरून धडा घेत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) सर्वच खासगी हॉस्पिटल, रुग्णालय आणि नर्सिंग होम्स (Private Hospitals, Nursing Homes) ना नोटीस बजावली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत (Emergency) रुग्णांना सेवा देताना अनामत रक्कम (Deposit) घेऊ नये. असे आदेश आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे (De Nina Borade PMC) आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar PMC) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation Health Department)

तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, उपचारास विलंब झाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून दीनानाथ रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. (Pune PMC News) महापालिका आरोग्य विभागाने दी बॉम्बे नर्सिंग होम एक्ट १९४९ चा आधार घेत ही नोटीस बजावली आहे.

आरोग्य विभागाने आपल्या नोटीसीत आणीबाणीच्या वेळी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणतीही अनामत रक्कम घेतली जाऊ नये, असे म्हटले आहे. तसेच नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नोटिसीत पुढे म्हटले आहे की, सरकारच्या अधिसूचनात नमूद केल्याप्रमाणे सर्व शुश्रुषागृहे रुग्णाच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीवित रक्षणच्या सेवा देतील व जीवित रक्षण साठीचे सुवर्णकालीन (Golden Hour Treatment) उपचार पद्धतीचे पालन करतील. असे देखील म्हटले आहे.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इमर्जन्सी स्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.