PMC Health Department | पोलिओ डोस पासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी पुढील ५ दिवस महापालिकेची घरोघरी जाऊन असणार मोहीम | नागरिकांनी सहकार्य करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आवाहन 

Homeadministrative

PMC Health Department | पोलिओ डोस पासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी पुढील ५ दिवस महापालिकेची घरोघरी जाऊन असणार मोहीम | नागरिकांनी सहकार्य करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आवाहन 

Ganesh Kumar Mule Oct 13, 2025 9:11 AM

AI Training in PMC | पुणे महानगरपालिकेत Ai प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
M J Pradip Chandren IAS | महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तका बाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे महत्वाचे आदेश | पेन्शन प्रकरणांना मिळणार गती 
PMC Employees Departmental Exam | वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांच्या माहितीत विसंगती  | लेखनिकी संवर्गासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन

PMC Health Department | पोलिओ डोस पासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी पुढील ५ दिवस महापालिकेची घरोघरी जाऊन असणार मोहीम | नागरिकांनी सहकार्य करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आवाहन

 

Pune Polio dose – (The Karbhari News Service) – १२ ऑक्टोबर  या दिवशी जे लाभार्थी पोलिओ डोस पासून वंचीत राहिले असतील अशा लाभार्थ्यांना विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेद्वारे पुढील ५ दिवस घरोघरी जाऊन टिम्सद्वारे पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत.  याकामी १९१२ टिम्स व ३२० सुपरवायझर्स पूर्ण शहरभर पुढील ५ दिवस कार्यरत राहणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये पुढील ५ दिवस पोलिओचे डोस देण्यात येतील. तरी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी घरोघरी पोलिओचे डोस पाजण्यासाठी येणाऱ्या टीम्स यांना नागरीकांनी तसेच सोसायटी मधील चेअरमन व सेक्रेटरी यांनी सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन  यांनी केले आहे. (M J Pradip Chandren IAS)

राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम – २०२५ रविवार १२ ऑक्टोबर रोजी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १५ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत राबविण्यात आली. सदर मोहिमेत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ० ते ५ वयोगटातील बालकांसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत ५४ दवाखाने १९ प्रसूतिगृहे व ६५ नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रे यथे तसेच वीटभट्ट्या, स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे, अतिजोखमिचे भाग या ठिकाणी सुद्धा बूथ लावण्यात आले होते.

मोहिमेचे उदघाटन मा. एम. जे. प्रदीप चंद्रन अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका यांचे शुभहस्ते सकाळी ८ वाजता कै. कलावती मावळे दवाखाना येथे प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना पोलिओ डोस पाजून करण्यात आले .सदर प्रसंगी डॉ. नीना बोराडे,आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, डॉ. वैशाली जाधव सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी पुणे महानगरपालिका, डॉ. अरविंद मखर, वैद्यकीय अधिकारी, लसीकरण विभाग, डॉ प्रदीप पवार, वैद्यकीय अधिकारी तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हायलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन खाडे, मुख्य लसीकरण कार्यालयातील सर्व आरोग्य सेवक उपस्थित होते.

सदर मोहिमेत रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १३५० पोलिओ बूथद्वारे ० ते ५ वयोगटातील सुमारे ३,१२,७५५ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी २,६२,०८८ (८४%) इतक्या लाभार्थ्यांना पोलिओचे डोस देण्यात आले. त्यापैकी प्रवासात असणाऱ्या बालकांना पोलिओ लस देण्यासाठी बस स्थानके, एस टी स्थान मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, एयर पोर्ट, उद्याने या ठिकाणी ८६ ट्रान्झीट टीम व ३७ मोबाईल टीम नेमण्यात आल्या होत्या या टीम्स द्वारे एकुण २०,७३० इतक्या लाभार्थ्यांना पोलिओचे डोस देण्यात आले.मे.राज्य शासनाकडून पुणे महानगरपालिकेस ४ लाख इतके पोलिओचे डोस प्राप्त झाले आहेत. प्राप्त डोस पैकी २,७०,२०५ इतके डोसेस वापरले गेले असून त्यापैकी ० ते ५ वयोगटातील २,६२,०८८ व ५ वर्षावरील ६५०९ इतक्या लाभार्थ्यांना डोस देण्यात आले. शासनाकडून २० हजार व्हायल्स प्राप्त झालेले असून त्यापैकी १५,५९५ पूर्ण व्हायल्स चा वापर करण्यात आला, ३८९६ पूर्ण व्हायल्स व ५०९ अर्धवट व्हायल्स परत आल्या. पुणे पल्स पोलिओ मोहिमेकामी विविध स्वयंसेवी संस्था, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांचे सहकार्य प्राप्त झाले. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: