PMC Helath Department | महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांना  वारसा हक्क लागू | शासन निर्णय नुसार अमल करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Homeadministrative

PMC Helath Department | महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू | शासन निर्णय नुसार अमल करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule Oct 03, 2025 8:12 PM

Pune Municipal Corporation Budget | पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ६१८ कोटींचे अंदाजपत्रक
PMC Election Voting Awareness | लोक कलेतून साकारला संसदीय लोकशाहीचा जागर | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृतीपर उपक्रम 
शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा | समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी

PMC Helath Department | महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांना  वारसा हक्क लागू | शासन निर्णय नुसार अमल करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करणेत आला आहे. सरकारच्या नगर विकास विभागाने याबाबत निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यावर अमल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. अशी माहिती उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.  (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील वर्ग-४ मधील किटक प्रतिबंध विभाग व नागरी हिवताप विभागाकडील फिल्डवर्कर व सायनोगेसिंग बिगारी (डीस इन्फेक्शन बिगारी + बिगारी निर्जंतुकीकरण) या पदाचे कामाचे स्वरूप पाहता सदर सेवकांना घाणभत्ता, धुलाईभत्ता व वारसा हक्क लागू करण्याबाबत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी शासनास प्रस्ताव पाठवला होता. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील सदर कर्मचान्यांना घाणभत्ता, धुलाईभत्ता व वारसा हक्क लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय लागू करण्यात आला आहे.

आयुक्त यांच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील किटक प्रतिबंध विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग ४ मधील फिल्डवर्कर व सायनोगेसिंग बिंगारी (डीस इन्फेक्शन बिगारी + बिगारी निर्जंतुकीकरण) सेवकांना घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर कर्मचान्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील २४.०२.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महानगरपालिका स्तरावर नियमोचित कार्यवाही करावी. असे निर्णयात म्हटले आहे.

| मनपा प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात बैठक

दरम्यान सरकारच्या या निर्णयावर अमल करण्याबाबत पुणे महापालिका कामगार संघटना यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे बैठक लावण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या सोबत संघटनेची बैठक झाली. बैठकीस पुणे महानगरपालिकेडील अधिकारी उप आयुक्त, सामान्य प्रशासन,  आरोग्य प्रमुख, सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उपस्थित होते. बैठकीत  आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभाग व नागरी हिवताप विभागाकडील सेवकांना  शासन निर्णयास अनुसरून कार्यवाही करणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहे.

महापालिका आयुक्तयांनी निर्णय घेवून बिंगारी सेवकांना न्याय दिला  असून त्यांनी सदर सेवकांना  शासन निर्णयानुसार २००६ पासून बारस हक्क लागू करणेबाबत निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयानुसार पात्र सेवकांची सर्व कागदपत्रांची छाननी करून नियमानुसार पुढील कार्यवाही आरोग्य विभाग व सामान्य प्रशासन विभागाने संयुक्त करावी असे आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी सूचित केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: