PMC General Administration Department | समाविष्ट २३ गावातील ४०८ कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन योग्य आहे का? महापालिका करणार तपासणी!
PMC Merged 23 Villages- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावातील ४०८ कर्मचाऱ्यांना (PMC Employees) अदा करणेत येत असलेल्या वेतनाची तपासणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC GAD) आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
नगर विकास विभाग, मंत्रालय यांचेकडील शासन निर्णय नुसार ३० जून २०२१ ला शासन अधिसूचना जारी झाली होती. त्यानुसार समाविष्ट २३ गावातील ४०८ कर्मचारी महापालिकेत घेण्यात आले होते. दरम्यान या कर्मचाऱ्यांना अदा करणेत येत असलेले वेतन योग्य आहे अगर कसे ? याबाबत तपासणी करणेकामी स्वतंत्र समिती गठीत करणेत आलेली आहे.
त्यानुषंगाने यासोबत जोडलेल्या ग्रामपंचायत सेवकांची यादीनुसार, खाते प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखाली संबंधित वेतन बिल लेखनिक यांना तपासणी करणे कामी सदर कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक, इतर आवश्यक कागदपत्रासह समिती हॉल, दुसरा मजला, नवीन इमारत, पुणे महानगरपालिका येथे समक्ष संपर्क साधनेबाबत आपले स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे. असे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.
COMMENTS