PMC Garden Department | होळीसाठी झाडाला हानी पोहोचवाल तर सावधान! 1 लाखापर्यंत होऊ शकतो दंड!    | पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचा इशारा 

HomeपुणेBreaking News

PMC Garden Department | होळीसाठी झाडाला हानी पोहोचवाल तर सावधान! 1 लाखापर्यंत होऊ शकतो दंड!  | पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचा इशारा 

गणेश मुळे Mar 19, 2024 2:26 PM

Kojagiri Purnima 2024 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!
PMC Garden Department | पुणे महापालिकेचे 42 वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 10 आणि 11 फेब्रुवारीला!
 Pune Municipal Corporation’s (PMC) 42nd Fruits, Flowers and Vegetables Competition and Exhibition on 10th and 11th February!

PMC Garden Department | होळीसाठी झाडाला हानी पोहोचवाल तर सावधान! 1 लाखापर्यंत होऊ शकतो दंड!

| पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचा इशारा

PMC Garden Department – (The Karbhari News Service) | होळी (Holi) निमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. असे आवाहन पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या (PMC Garden Department) वतीने करण्यात आले आहे. विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी 1 लाखा पर्यंत दंड होऊ शकतो. असा इशारा उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांनी नागरिकांना दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम २००९ व मे.उच्च न्यायालय, मुंबई यांचे २० सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशान्वये,वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज करण्यात येते. (Pune PMC News)
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. अश्या गुन्हास “शासनाद्वारे अधिसुचित करण्यात येईल अशा पद्धतीचा वापर करून, काढलेल्या मुल्याइतके परंतू, एक लाख रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा आहे.’

तथापि महापालिका उद्यान विभागाकडून शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात आले की, होळी निमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्ष तोडीत असल्यास किंवा विस्तार कमी करीत असल्यास, संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे मा. महापालिका सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी / वृक्ष प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगरपालिका, यांचेकडे तक्रार करावी किंवा टोल फ्री क्रमांक – १८००१०३०२२२, व्हॉटस अॅप क्रमांक ९६८९९००००२ यावर किंवा www.complaint. punecorporation.org या तक्रार पोर्टलवर अथवा एस.एम.एस. अॅलर्ट या भ्रमणध्वनी सेवा क्र. ९२२३०५०६०७ यावरही विनाविलंब एस. एम. एस. करावा.